Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : पीक नुकसानीच्या भरपाईसाठी सोलापुरात ६४ कोटींचा प्रस्ताव

Heavy Rain Crop Loss : जिल्ह्यात यंदा मे मध्ये सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली. काही मंडलांमध्ये अतिवृष्टीही झाली. या पावसामुळे ३२ हजार ४१५ शेतकऱ्यांच्या २१ हजार ९७१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Solapur News : जिल्ह्यात यंदा मे मध्ये सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली. काही मंडलांमध्ये अतिवृष्टीही झाली. या पावसामुळे ३२ हजार ४१५ शेतकऱ्यांच्या २१ हजार ९७१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

या नुकसानग्रस्त बाधित शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी पंचनामे पूर्ण झाले असून, प्रशासनाच्या वतीने ६४ कोटी ३८ लाख ७२ हजार रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या पावसाने झालेल्या एकूण नुकसानीत २२ हजार हेक्टरचे नुकसान असले, तरी सर्वाधिक त्यात फळबागांचे नुकसान झाले आहे. त्यात द्राक्षे, आंबा, डाळिंब आणि केळी बागांचा समावेश आहे.

माढा, करमाळा व माळशिरस तालुक्यांतील फळबागांचे सर्वाधिक नुकसान आहे. या नुकसानीनंतर पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रशासनाला दिले होते.

त्यानंतर हे पंचनामे पूर्ण होऊन, त्यासाठीच्या अपेक्षित नुकसान भरपाईचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. आता तो शासनाकडे पाठवण्यात आला आहे. निधी उपलब्ध झाल्यानंतर तहसील कार्यालयामार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे, असे सांगण्यात आले.

फळबागांचे तालुकानिहाय नुकसानग्रस्त क्षेत्र (हेक्टरमध्ये)

माढा ७५६९, करमाळा २४०१, उत्तर सोलापूर १०७९, दक्षिण सोलापूर ४८४, मंद्रूप १४ अक्कलकोट ६६, पंढरपूर ३२४, मोहोळ ८७८, मंगळवेढा २७, सांगोला ८५, माळशिरस १८१२.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bacchu Kadu: शेतकरी आत्महत्याप्रश्‍नी ‘सिंदूर यात्रा’ काढणार : कडू

Fort Conservation: गड-किल्ले स्वच्छता, संवर्धन उपक्रमात युवकांचा सहभाग

Panand Road: राज्यात पाणंद रस्त्यांच्या हद्दी होणार निश्चित

Lumpy Skin Disease: बुलडाण्यात ‘लम्पी’ प्रतिबंधक लसीकरण मोहीम वेगात

Fake Officer Threat: सभापतींच्या कार्यालयातील कृषी अधिकाऱ्याच्या धमकीने खळबळ

SCROLL FOR NEXT