Animal Care Agrowon
ॲग्रो विशेष

High Temprature : खानदेशात उष्णतेने पशुधनही बेजार ; सातपुडा पर्वतासह अन्य भागांतही समस्या

Heat Stress : खानदेशात सतत वाढत्या उष्णतेने पिकांसह पशुधनावरही प्रतिकूल परिणाम झाला आहे. सातपुडा पर्वतासह अन्य भागात पशुधनात विविध आजारांची समस्या दिसत आहे.

Team Agrowon

Jalgaon News : जळगाव ः खानदेशात सतत वाढत्या उष्णतेने पिकांसह पशुधनावरही प्रतिकूल परिणाम झाला आहे. सातपुडा पर्वतासह अन्य भागात पशुधनात विविध आजारांची समस्या दिसत आहे. यात शासकीय यंत्रणा अपुऱ्या पडत असून, वेळीच या समस्येबाबत कार्यवाही करून आजार नियंत्रणात आणण्याची मागणी केली जात आहे.

खानदेशात उष्णता यंदा फेब्रुवारीतच सरासरीपेक्षा अधिक राहीली. यानंतर सतत तापमानात वाढ होत आहे. अनेक भागात रात्री उशिरा उष्ण झळा असतात. यामुळे पिके होरपळत असून, पिकांत विविध समस्या तयार होत आहे. ती दूर करण्यासाठी शेतकऱ्यांना सिंचन व्यवस्थापन, खते, फवारण्या व अन्य असा मोठा खर्च करावा लागत आहे. ग्रामीण भागात उष्माघाताची समस्या जाणवू लागली आहे.

कारण कमाल तापमान ४६ अंश सेल्सिअसवर आहे. अशीच स्थिती पशुधनातही आहे. पशुधनही बेजार झाले आहे. दुधाळ पशुधनाच्या दूध उत्पादन क्षमतेवर परिणाम झाला आहे. ताप, हगवण अशा समस्या पशुधनात दिसत आहेत. लंपी स्कीन व अन्य गंभीर आजारांच्या तक्रारी मध्यंतरी होत्या. पावसाळ्यातही आजारांच्या समस्या पशुधनात होत्या. त्या कशाबशा कमी होत असतानाच तापमानाची समस्या तयार झाली आहे.

काही भागात लाळ्या खुरकूत आजाराच्या तक्रारी आहेत. प्रत्येक गावात पशुधन आजारी आहे. तापमान ४० अंश सेल्सिअसवर असल्याने पशुधनाच्या प्रतिकारक्षमतेलाही बाधा पोचली आहे. यातच अनेक जण भाकड पशुधनही घरीच बांधून ठेवत आहेत. कारण माळरानात चारा नाही. चराईसाठी अनेकांनी पशुधन शिवारात पाठविणे बंद केले आहे. एकाच ठिकाणी राहून पशुधनाच्या प्रतिकार शक्तीला धक्का बसला आहे. अनेक शेतकऱ्यांकडे पक्के गोठे किंवा बंदिस्त गोठे नाहीत. उघड्यावरच पशुधनाचा निवारा रात्रंदिवस असतो. या पशुधनाला मोठा फटका बसला आहे.

पक्के गोठे नसल्याने नुकसान

सातपुडा पर्वतात पक्के गोठे व बंदिस्त गोठ्यांची संख्या अल्प आहे. उघड्यावरच या भागातील पशुधन असते. या पशुधनाचे मोठे नुकसान होत आहे. नंदुरबारातील अक्कलकुवा, धडगाव, शहादा, तळोदा, जळगावातील चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर भागातील सातपुडालगत व पर्वतीय क्षेत्रातील पशुधनात आजाराची समस्या अधिक असल्याची माहिती मिळाली.

पशुवैद्यकीय दवाखाने अल्प

खानदेशात पशुवैद्यकीय यंत्रणा वाढलेलीच नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रांपेक्षा अधिकची बिकट अवस्था पशुवैद्यकीय दवाखान्यांची आहे. अनेक पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या इमारती गळक्या, नादुरुस्त आहेत. त्यात अधिकारी आपले कामकाज करू शकत नाहीत, अशी स्थिती आहे. यात एकाच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यावर चार ते पाच दवाखान्यांचा किंवा १५ ते २० गावांचा कार्यभार आहे. पशुधन पर्यवेक्षक गावोगावी सर्वेक्षण करीत नाहीत. यामुळेही पशुधनात आजार पसरत असल्याच्या तक्रारी आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT