Soil Testing Agrowon
ॲग्रो विशेष

Soil Health : जमिनीचे आरोग्य सांभाळणे गरजेचे

Organic Carbon : शेतीमध्ये जमिनीला अत्यंत महत्त्व असून, जमिनीला लाखो वर्षांची परंपरा आहे, पण आपण मागील दहा ते पंधरा वर्षात जमिनीचे आरोग्य खतांचा व औषधांचा अतिरेक करून बिघडवल्यामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब कमी झाला आहे.

Team Agrowon

Solapur News : जमिनीमध्ये चांगले विषमुक्त सेंद्रिय उत्पादन घेण्यासाठी व जमिनीची सुपीकता कायम टिकवण्यासाठी जमिनीचे आरोग्य अत्यंत गरजेचे आहे, असे मत कृषिभूषण अंकुश पडवळे यांनी व्यक्त केले.

सोलापूर तालुका पोलिस स्टेशन व युथ संकल्प फाउंडेशन, नान्नज यांच्यावतीने नान्नज येथे सेंद्रिय शेती कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्या वेळी पडवळे बोलत होते. सोलापूर ग्रामीण पोलिस विभागाचे जिल्हा पोलिस प्रमुख अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून सदर कार्यक्रम घेण्यात आला.

या वेळी तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे, रोहयो परिषदेचे अध्यक्ष शहाजी पवार, कृषिभूषण दत्ता काळे, कृषिभूषण नागेश ननवरे, भाजपचे तालुकाध्यक्ष संभाजी दडे, योगेश गवळी, नीलेश गवळी, अभय गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ कदम, कारंब्याचे माजी सरपंच विनायक सुतार प्रगतिशील शेतकरी हनुमंत गवळी, उद्योजक संजय मेटकरी, शाहरुखभाई पटेल, मनोहर शिरसाट आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

श्री. पडवळे म्हणाले, की शेतीमध्ये जमिनीला अत्यंत महत्त्व असून, जमिनीला लाखो वर्षांची परंपरा आहे, पण आपण मागील दहा ते पंधरा वर्षात जमिनीचे आरोग्य खतांचा व औषधांचा अतिरेक करून बिघडवल्यामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब कमी झाला आहे.

जमिनीचे माती परीक्षण करून गरजे इतकाच रासायनिक खतांचा वापर करून सेंद्रिय खत घरच्या घरी तयार करून त्याचा वापर जमिनीत वाढविण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात नियोजनपूर्वक कष्ट करून शेतीत वेळ दिला, तर शाश्‍वत शेतीचे मॉडेल उभारायला वेळ लागणार नाही.

शेतकऱ्यांनी अँड्रॉइड फोनचा वापर शेतीतले ज्ञान मिळवण्यासाठी करून शेतीतील मार्केटिंगचा अभ्यास करून पिकांची लागवड करणे ही अत्यंत गरजेचे आहे, असे पडवळे म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोलापूर तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी केले. या वेळी शहाजी पवार, दत्ता काळे, अभय गायकवाड, संभाजी दडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT