Pumpkin Seed  Agrowon
ॲग्रो विशेष

Pumpkin Seed : भोपळा बियांचे आरोग्यदायी फायदे

Pumpkin Seed Health benefits : भोपळा सर्वांना परिचित आहेच. मात्र भोपळ्याच्या बिया देखील आरोग्यासाठी फायदेशीर असतात. भोपळ्याच्या बियांमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, तंतुमय पदार्थ, अँटिऑक्सिडंट, मॅग्नेशिअम आदी घटकांचे मुबलक प्रमाण असते.

Team Agrowon

कृष्णा काळे, ऐश्वर्या काळे

भोपळा सर्वांना परिचित आहेच. मात्र भोपळ्याच्या बिया देखील आरोग्यासाठी फायदेशीर असतात. भोपळ्याच्या बियांमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, तंतुमय पदार्थ, अँटिऑक्सिडंट, मॅग्नेशिअम आदी घटकांचे मुबलक प्रमाण असते.

भोपळ्याच्या बियांमध्ये शरीराला आवश्यक पोषक घटक मुबलक प्रमाणात असून त्यांचे सेवन केल्यामुळे थकवा आणि अशक्तपणा सारख्या समस्या दूर होण्यास मदत होते. तसेच ह्रदयाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी भोपळ्याच्या बिया फायदेशीर ठरतात.

फायदे

वजन कमी करण्यास मदत

  • स्नॅक्स म्हणून भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक, कॅल्शिअम, प्रथिने तसेच तंतुमय पदार्थ मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे शरीरास आवश्यक पोषक घटक यातून मिळतात. त्यामुळे भूक लागण्याची भावना होत नाही.

  • भोपळ्याच्या बियांमधील तंतुमय पदार्थ पचनसंस्थेचे कार्य सुरळीत पार पाडण्यास मदत करतात.

  • सकाळी नाश्‍त्यामध्ये भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्यामुळे दिवसभर बाहेरील खाद्यपदार्थ खाण्याची होणारी इच्छा कमी होते. त्यामुळे वजन वाढण्यापासून प्रतिबंध होतो.

  • भोपळ्याच्या बियांमधील झिंक अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करते. त्यामुळे वजन कमी करण्यास मदत करते.

अँटिऑक्सिडंट्सचा समृद्ध स्रोत

  • भोपळ्याच्या बियांमध्ये जीवनसत्त्वे ई आणि कॅरोटीनाइड्स सारखे अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.

  • कॅरोटीनॉइड्स रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. त्यामुळे विविध आजारांपासून शरीराचे संरक्षण होते.

  • त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी कॅरोटीनोइड्स, कोलेजन गुणकारी ठरतात.

  • भोपळ्याच्या बियांमधील अँटिऑक्सिडंट्स मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करते. जळजळ कमी होते.

कर्करोगाचा धोका कमी होतो

अभ्यासातून असे दिसून आले आहे, की भोपळ्याच्या बियांचा समावेश आहारामध्ये केल्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो. आहारात भोपळ्याच्या बियांचा समावेश केल्यामुळे फुफ्फुस, पोट, प्रोस्टेट आणि कोलन कॅन्सर टाळता येईल.

मॅग्नेशिअमचा समृद्ध स्रोत

  • बऱ्याच लोकांमध्ये मॅग्नेशिअम कमतरतेचे लक्षणे दिसून येतात. मॅग्नेशिअमच्या कमतरतेचा सामना करण्यासाठी भोपळ्याच्या बिया उत्तम स्रोत आहेत.

  • रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आणि हृदय विकाराचा धोका टाळण्यासाठी भोपळ्याच्या बियांचा महत्त्वपूर्ण आहे.

  • हाडांचे आरोग्य राखण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास देखील मदत होते.

हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत

  • भोपळ्याच्या बियांमधील अँटिऑक्सिडंट्स, झिंक आणि मॅग्नेशिअम हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत करतात. याव्यतिरिक्त, भोपळ्याच्या बिया उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात.

  • हृदयविकारासाठी महत्त्वाचे असलेले उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी ही कारणीभूत ठरते. भोपळ्याच्या बियांचा दैनंदिन आहारात समावेश केल्यामुळे रक्तातील नायट्रिक ऑक्साइड वाढण्यास मदत होते. त्याचे आपल्या हृदयाच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसून येतात.

  • नायट्रिक ऑक्साइड रक्तप्रवाहाचे वहन सुरळीत होण्यासाठी रक्तवाहिन्या विस्तृत करण्याचे कार्य करते. त्यामुळे हृदयाच्या आजारांना प्रतिबंधित करते.

मधुमेहावर गुणकारी

रक्तातील साखर वाढल्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. त्यासाठी भोपळ्याच्या बिया गुणकारी ठरतात. भोपळ्याच्या बियांमधील मॅग्नेशिअम रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास महत्त्वपूर्ण ठरते. भोपळ्याच्या बियांचा समावेश आहारामध्ये केल्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो.

मूत्रविकारावर गुणकारी

भोपळ्याच्या बिया सौम्य प्रोस्टेटिक हायपरप्लासियाच्या (BPH) लक्षणांपासून बचाव करतात. संशोधनानुसार मूत्राशयाच्या विकारांवर भोपळ्याच्या बिया गुणकारी ठरतात.

झोपेची गुणवत्ता सुधारते

दररोज झोपण्यापूर्वी मूठभर भोपळ्याच्या बिया खाल्ल्यास चांगली झोप येण्यास मदत होते. भोपळ्याच्या बियांमधील अमिनो ॲसिड, ट्रिप्टोफॅन झोपेला प्रोत्साहन देतात. भोपळ्याच्या बियांमधील झिंक आणि मॅग्नेशिअमची पातळी देखील शांत झोपेचे स्वरूप तयार करते. आपली दैनंदिन कामकाज सुरळीत होण्यासाठी पुरेशी झोप आवश्यक असते. त्यासाठी झोपेची गुणवत्ता सुधारणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे दिवसभराच्या कामासाठी आवश्यक असलेली ऊर्जा मिळते. त्यासाठी दररोज झोपण्यापूर्वी मूठभर भोपळ्याच्या बिया खाल्ल्यास झोप चांगली येते. तसेच थकवा आणि अशक्तपणा सारख्या समस्या कमी होतात.

- कृष्णा काळे, ८८०५९६८५३६

(लेखक अन्नप्रक्रिया तज्ज्ञ आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : कळंबामध्ये भात, सोयाबीन वाचविण्यासाठी धडपड

Jat water Issue : जतमध्ये पाणीप्रश्न, म्हैसाळ योजनेचा मुद्दा गाजणार

Nagpur Assembly Constituency : शिवसेना ठाकरे गटाला नागपूरध्ये एकही जागा नाही; काँग्रेस सर्व सहा मतदार संघांत लढणार

Jaggery Production : गुऱ्हाळघरे अद्याप थंडच

Dhananjay Munde Property : कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या संपत्तीत दुप्पटीने वाढ; ५ वर्षात ३१ कोटी रूपये वाढले

SCROLL FOR NEXT