Cotton Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Productivity : विशेष प्रकल्पातून देशात कापूस उत्पादकतेत वाढ

Cotton Farming : देशात कापसाची उत्पादकता वाढावी विशेष प्रकल्पाअंतर्गंत एचडीपीएस (हाय डेन्सीटी प्लॅटीग सिस्टीम) ला प्रोत्साहन देण्यात आले.

Team Agrowon

Nagpur News : देशात कापसाची उत्पादकता वाढावी विशेष प्रकल्पाअंतर्गंत एचडीपीएस (हाय डेन्सीटी प्लॅटीग सिस्टीम) ला प्रोत्साहन देण्यात आले. आठ राज्यात या प्रकल्पातून कापसाची उत्पादकता वाढ साध्य झाल्याचे निरीक्षण आहे.

वर्धा येथील दिलीप पोहाणे यांनी तर एकरी २४ क्‍विंटलचा पल्ला गाठला. हे या प्रकल्पाचे मोठे यश असल्याचे मत केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. विजय वाघमारे यांनी व्यक्‍त केले.

कापूस उत्पादकतावाढ विषयक प्रकल्पात समावेशीत वर्धा व नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सिटी सिडीआरए (कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन टेक्स्टाईल इंडस्ट्री) या संस्थेच्या वतीने विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कापूस संशोधन संस्थेच्या सभागृहात आयोजित या कार्यशाळेच्या अध्यक्षपदावरुन डॉ. वाघमारे बोलत होते.

केंद्रीय कृषी मंत्रालयाचे विशेष अधिकारी डॉ. अरविंद वाघमारे, कापूस उत्पादकता वाढ विषयक प्रकल्पाचे समन्वयक डॉ. अर्जुन तायडे, अमरावती विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे, वर्धा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. नलीनी भोयर, सिटी सीडीआर चे प्रकल्प समन्वयक गोविंद वैराळे यांची यावेळी उपस्थिती होती. डॉ. वाघमारे पुढे म्हणाले, अतीघन, सघन कापूस लागवड पद्धतीमुळे कापसाच्या उत्पादकतेत वाढ झाली आहे.

त्यामुळेच यंदा देखील हा प्रकल्प केव्हीकेच्या माध्यमातून राबविला जात आहे. दिलीप पोहाणे या शेतकऱ्याने एकरी २४ क्‍विंटलची उत्पादकता यातून मिळविली. त्यामुळे त्यांच्या व्यवस्थापन कौशल्याचे अनुकरण करण्याची गरज आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी २०२३० पर्यंत देशाला कापूस क्षेत्रात स्वयंपूर्ण करणार असल्याची घोषणा केली आहे.

त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद शेतकऱ्यांनी कापूस उत्पादकता वाढीसाठीच्या प्रकल्पात सहभाग वाढवावा, असे आवाहन केले. डॉ. अर्जुन तायडे यांनी आठ राज्यातील प्रकल्पातील अंमलबजावणी व त्यातून मिळालेले यश याविषयी लेखाजोखा मांडला.

कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रामकृष्ण, डॉ. बाबासाहेब फड, डॉ. शैलेश गावंडे, डॉ. मणिकंदन यांनी कापूस व्यवस्थापन क्षेत्रातील उत्तम पध्दतींची माहिती दिली. प्रास्ताविकातून गोविंद वैराळे यांनी गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रात प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी कशाप्रकारे झाली याविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन प्रकल्प अधिकारी जगदीश नेरलवार, युगांतर मेश्राम यांनी केले अमित कवाडे यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफीची पुढची कार्यवाही सुरु, कोणत्या बँकेचं कर्ज माफ होणार?, मुख्यमंत्री फडणवीसांची महत्त्वाची माहिती

Self Help Groups: बचत गटांच्या उत्पादनांना वर्षभर विक्रीची संधी मिळावी

Khamgaon APMC: खामगाव बाजार समितीत ‘शिदोरी गृहा’स प्रारंभ

Agriculture Rail Transport: शेतमालासाठी रेल्वे वाहतूक

Agriculture Development: कृषी क्षेत्र अधिक सक्षम करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT