Paddy Harvesting Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Harvesting : चिखलातून भात कापणी, मळणीमुळे कष्ट वाढले

Paddy Crop : यावर्षी दीर्घकाळ परतीच्या पावसामुळे भाताच्या वाफ्यात पाणी तुंबून आहे. कापणी करताना वावर होऊन चिखल होत आहे.

Team Agrowon

Kolhapur News : यावर्षी दीर्घकाळ परतीच्या पावसामुळे भाताच्या वाफ्यात पाणी तुंबून आहे. कापणी करताना वावर होऊन चिखल होत आहे. कापलेले कवळे ओलसर जमिनीवर जास्त वेळ ठेवून नुकसान होऊ नये म्हणून ते लगेच उचलावे लागत आहेत.

शिवारात मळणीसाठी जागा नसल्याने कोरड्या जागेत त्याची वाहतूक करावी लागत आहे. एकूणच यावर्षी कापणी आणि मळणीचे कष्ट वाढले आहेत. तालुक्यात सर्वत्र भाताचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. अतिपावसाच्या पश्‍चिम आणि दक्षिण विभागात रोप लावण पद्धतीने, तर पूर्व भागात धूळवाफ पेरणी पद्धतीने भाताचे पीक घेतले जाते.

जून-जुलैच्या दरम्यान लागण केलेले पीक ऑक्टोबरच्या मध्यापासून कापणीला येते. या वर्षीही योग्य वेळी पीक कापणीला आले होते, मात्र परतीचा पाऊस दीर्घकाळ रेंगाळल्याने संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात कापणी करणे अशक्य झाले. वाफ्यात पाणी साचलेले आणि दररोज सकाळी किंवा सायंकाळी पाऊस येत असल्याने शेतकऱ्याने कापणीचे धाडस केले नाही.

गेले आठवडाभर पावसाने उसंत घेतल्याने कापणी व मळणीच्या कामाला गती आली आहे. शिवार माणसांनी फुलून गेले आहे, मात्र पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने अजूनही वाफ्यातील पाणी कमी झालेले नाही. कापणीसाठी शेतात उतरलेल्या माणसांच्या पावलांनी त्याला चिखलाचे स्वरूप येत आहे.

ट्रॅक्टर, पॉवर ट्रिलरचा वापर वाढला

कापलेले भात कोरड्या जागेत नेण्यासाठी लगेच उचलावे लागत आहे. शिवारात सर्वत्र दलदल असल्यामुळे दूरवर त्याची वाहतूक करावी लागत आहे. मळणीसाठी ट्रॅक्टर, पॉवर ट्रिलर आणि मळणी मशिनचा वापर वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Economy : अर्थव्यवस्थेत पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के वाढ; शेतीचं चित्र पावसावर अवलंबून

Plant Nutrition: अन्नद्रव्ये पिकांना कशी मिळतात?

Chickens Breeding Management: ब्रीडर कोंबड्यांचे प्रजनन व्यवस्थापन

Tribal Farmer Relief: वनपट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी, महसूलमंत्री बावनकुळेंची माहिती

Chakan Livestock Market: नावारूपाला आलेला चाकणचा जनावरांचा बाजार

SCROLL FOR NEXT