Labor Shortage  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Labor Wages : शेतकऱ्यांना मजुरी दर परवडेना

Labor Shortage : खानदेशात रब्बी पिकांची कापणी, मळणी सुरू आहे. दुसरीकडे मजूरटंचाईदेखील आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात रब्बी पिकांची कापणी, मळणी सुरू आहे. दुसरीकडे मजूरटंचाईदेखील आहे. मजुरी दर २०२१ मध्ये वधारल्यानंतर मजुरी दर वाढले. आता कापूस, सोयाबीन, हरभरा, केळी, कलिंगड, तूर आदी पिकांचे दर कमी आहेत. कापूस दर ६५०० ते ६८०० रुपये प्रतिक्विंटल असून, यानुसार मजुरीदर परवडत नसल्याची स्थिती आहे.

खानदेशात रब्बी पिकांची पेरणी अधिक आहे. बागायती पिकांची लागवड यंदा बऱ्यापैकी झाली आहे. त्यात आता कापणी, मळणी, काही भागात कापूस वेचणी सुरू आहे. तसेच केळी, भाजीपाला व अन्य पिकांत तणही वाढले आहे, पण खरिपानंतर आता रब्बीतही मजूरटंचाई जाणवू लागली आहे. केळी, भाजीपाला पिकात तण काढणे आवश्यक आहे.

पण मजूर नसल्याने अनेक शेतकरी अडचणीत आहेत. भाजीपाला, लहान केळी पिकात तणनाशकांचा उपयोग करता येत नाही. २०२१ मध्ये कापूसदर ८२०० ते नऊ हजार रुपये प्रतिक्विंटल होते. काही शेतकऱ्यांना यापेक्षा अधिक दर मिळाले. परंतु आता किंवा २०२२, २०२२ व २०२४ मध्येही कापसाला दर हवे तसे मिळालेले नाहीत.

केळी दरही कमी आहेत. सोयाबीन, उडीद, मूग पिकात मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. तूर, केळी, कलिंगड, सोयाबीन, हरभरा कापूस दर आता कमी असल्याने मजुरी दर कमी करावेत, प्रशासनाने यात हस्तक्षेप करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. सर्व पिकांचा एकरी खर्च वाढला आहे.

कापसाचे एकरी उत्पादन चार क्विंटल बागायती कापसासंबंधी येते. तर कोरडवाहू कापसाचे उत्पादन एक क्विंटलही येत नाही. कलिंगड, हरभरा, तूर पिकातही उत्पादन कमी आहे. उष्णतेची समस्या आहे.

आताचे २०० रुपये मजुरीदर परवडत नाहीत. केळी, कलिंगडाचे दर मागील वर्षी चांगले होते. यामुळे मजुरीचे दरही वाढवा, अशी मागणी ग्रामीण भागात सुरू झाली. शेतकऱ्यांनीही मजुरी दर वाढविले होते. पण आता शेतीमालाचे दर परवडणारे नाहीत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mango Crop: आंबा उत्पादनात ५० टक्के घट होण्याचा अंदाज

Maize Farmers: मका उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या

Cotton Purchase: हमीभावाचा आधार नाही; कापूस गेला कमी दरात

Animal Market Action: लकडगंजमधील वन्यजीवांच्या बेकायदा बाजारावर होणार कारवाई

Natural Farming: नांदेडला डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियानाला गती

SCROLL FOR NEXT