Labor Migration : रायगड जिल्ह्यात रोजगाराचा तुटवडा, हजारोंवर स्थलांतराची वेळ

Raigad District : पर्यटन आणि उद्योगामध्ये रायगड जिल्हा अव्वल स्थानी असल्याच्या वल्गना राजकारणी करीत आहेत; मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे.
Labor Migration
Labor MigrationAgrowon
Published on
Updated on

Raigad News : पर्यटन आणि उद्योगामध्ये रायगड जिल्हा अव्वल स्थानी असल्याच्या वल्गना राजकारणी करीत आहेत; मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे. दारिद्र्यरेषेखालील नागरिकांची संख्या मोठी असून रोजगाराअभावी स्‍थलांतर वाढत आहे.

जिल्ह्यात तीन लाख ७९ लोकसंख्येपैकी एक लाख १४ हजार नागरिक किमान गरजाही भागवू शकत नाहीत. ग्रामीण विकास प्रकल्प संचालकांकडून नुकत्‍याच प्रसिद्व अहवालात दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांची टक्केवारी ३०.२१ इतकी असल्‍याचे समोर आली आहे.

सुधागड तालुक्यातील ४८.४८ टक्के कुटुंबे दारिद्र्यरेषेखालील जीवन जगत आहेत. आदिवासीबहुल तालुक्यात रस्ते, आरोग्य, शिक्षणाच्या पुरेशा सुविधा विकसित झाल्या नाहीत. त्यामुळे स्थलांतराचेही प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत.

Labor Migration
Labor Migration : सातपुडा पहाडातील मजूर कामाच्या शोधात

येथील ७० टक्के आदिवासी लोक रोजगारासाठी तात्पुरते स्थलांतर करतात तर इतर मागास प्रवर्गातील कुटुंब आपले गाव सोडून पालघर जिल्ह्यात कायमस्वरूपी स्थलांतरित होण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे सुधागड, रोहा, मुरूड येथील गावेच्या गावे ओसाड पडली आहेत. अशीच स्थिती माणगाव, म्हसळा, तळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर तालुक्यांची आहे.

साधारण ३० टक्के नागरिकांनी यापूर्वीच कायमस्वरूपी स्थलांतर केले आहे, तर ५५ टक्के कुटुंबीयांचे गावाकडे रेशन कार्ड, मतदान आहे तर रोजगारासाठी तात्पुरत्या स्वरूपात मुंबई परिसरात बस्तान मांडून आहेत. निवडणुका, प्रमुख सणांसाठी ही कुटुंबे गावाकडे येतात. ज्यांनी अद्याप गाव सोडलेला नाही, त्यांचीही परिस्थिती फारशी चांगली नसल्‍याचे ग्रामीण विकास यंत्रणेच्या अहवालात नमूद केले आहे.

Labor Migration
Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

उत्पन्नात विषमता

महाड, रोहा तालुका वगळता दक्षिण रायगडमध्ये उत्पन्नाचे साधन अद्याप शेतीच आहे. पर्यटन उद्योग आता विकसित होत असला तरी त्यावर अवलंबून कुटुंबांची टक्केवारी खूपच कमी आहे. ज्यांच्याकडे जमीन, वाडी, बागायती आहे, अशी १० टक्के कुटुंबे सधन आहेत. त्यांच्यावर इतर ९० टक्के कुटुंबे अवलंबून असल्याची स्थिती दक्षिण रायगडात आहे.

मध्य आणि दक्षिण रायगडमध्ये रोजगाराच्या खूप साऱ्या संधी भविष्यात निर्माण होत आहेत. दिघी पोर्टमुळे येथे नवनवे उद्योग-व्यवसाय येण्यास सुरुवात झाली आहे. या उद्योगाबरोबरच फलोद्यान, कृषी पर्यटन यांसारख्या क्षेत्रांना प्राधान्य दिले जात आहे. हे चित्र भविष्यात नक्की बदललेले असेल.
- आदिती तटकरे, महिला व बालकल्याणमंत्री
सरकारच्या योजना आहेत तळागाळात पोहोचत नाहीत. येथील नागरिकांची मानसिकताही त्यास कारणीभूत आहे. थोड्याशा अपयशानंतर खचून जाऊन दुसरे लोक काय म्हणतील यावर विचार करून ते प्रयत्न सोडून देतात. शेतीकडे दुर्लक्ष केले जात आहे. काहीजण जमीन ओसाड सोडून ती विकण्याचे प्रमाण जास्त आहे.
- तुषार इनामदार, उपसंचालक, स्वदेश फाउंडेशन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com