Milk Production agrowon
ॲग्रो विशेष

Milk Production : सूर्य तळपू लागला, दुभत्या जनावरांचे दूध उत्पादन घटण्याची भिती

Heat Wave : पुढचे काही दिवस हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Sangli Heat Wave : मागच्या काही दिवसांपासून अचानक तापमानात वाढ झाल्याने उष्णतेत मोठी वाढ झाली आहे. अशातच पुढचे काही दिवस हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. याचा सर्वाधिक फटका जनावरांना बसण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यांच्या दुभत्या जनावरांच्या उत्पादनात लक्षणीय घट होऊन वंध्यत्व येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच दक्षता घेणे आवश्यक आहे.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी शेतीस जोडधंदा म्हणून जनावरांचे पालन पोषण करतात. काही ठिकाणी जनावरांच्या उत्पादनावर शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह चालतो. सूर्य तळपू लागल्याने सर्वत्र उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमान ३९ ते ४१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे.

त्यामुळे त्याचा त्रास जनावरांना अधिक जाणवू लागला आहे. दुभत्या जनावरांचे दूध उत्पादन घटू लागले आहे. तसेच त्यांच्यात वंध्यत्व होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचा आर्थिक फटका पशुपालकांना बसू लागला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

प्रत्येक शेतकऱ्याकडे गायी, म्हशींचे पालनपोषण केले जाते. उन्हाळ्याच्या दिवसात त्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. यात जनावरांना गरजेनुसार पाणी पिण्यास द्यावे. जनावरांच्या शेडवर सिमेंटच्या किंवा कोटिंगच्या पत्र्याचा वापर करावा. गोठ्याच्या दोन्ही बाजू खुल्या असाव्यात. गोठ्याच्या बाजूने सावलीसाठी झाडे लावणे गरजेचे आहे. या वातावरणात जनावरांना दिवसाकाठी एकदा पाण्याने धुणे गरजेचे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT