Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Wild Animal Rampage : डुकरांच्या उपद्रवामुळे वावीत अर्धा एकर मका भुईसपाट

Wild Boar Attack : वावी गावठाणजवळ लेंडी नाल्यालगत संतोष कांदळकर यांचे एकत्रित कुटुंबाचे पाच एकर शेतजमीन क्षेत्र आहे.

Team Agrowon

Nashik News : तालुक्यातील वावी गावात मोकाट सोडून दिलेल्या पाळीव डुकरांचा उपद्रव वाढल्यामुळे शेतकऱ्याला सुमारे अर्धा एकर क्षेत्रातील मका पिकावर पाणी सोडावे लागले. डुकरांच्या उच्छादामुळे संपूर्ण पीक भुईसपाट झाले असून याबाबत डुकरांचे पालन करणाऱ्यांना वारंवार सांगूनही त्याकडे डोळेझाक होत असल्याचा आरोप करत डुकरांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई संबंधितांनी द्यावी यासाठी शेतकऱ्याने उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.

वावी गावठाणजवळ लेंडी नाल्यालगत संतोष कांदळकर यांचे एकत्रित कुटुंबाचे पाच एकर शेतजमीन क्षेत्र आहे. त्यापैकी २० गुंठे क्षेत्रात लागवड केलेले मका पीक डुकरांमुळे भुईसपाट झाले आहे. रात्रीअपरात्री डुकरांच्या झुंडी शेतात शिरतात आणि पिकांचे नुकसान करतात.

ही डुकरे गावातीलच व्यक्तींनी पाळलेली असून त्यांना याबाबत वारंवार सांगूनही दुर्लक्ष झाले आहे. या डुकरांचा उपद्रव थांबवण्यासाठी कोणताही बंदोबस्त संबंधितांकडून केला जात नाही. शेतात आलेली डुकरे हाकलण्यासाठी गेल्यावर ही डुकरे हल्ला करण्याचा प्रयत्न करतात.

डुकरांमुळे आपले सुमारे ३० ते ३५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे कांदळकर यांनी म्हटले आहे, याबाबत ग्रामपंचायत कार्यालयात तक्रार अर्ज दिला, मात्र पोलिसांनी अर्ज स्वीकारण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे त्यांनी सांगितले.

डुकरांच्या मालकांकडून पिकाच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, या मागणीसाठी उपोषण करणार असल्याचे ते म्हणाले.

वारंवार सांगूनसुद्धा एकदाही संबंधित मालक डुकरांनी केलेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी फिरकला नाही. संबंधितांच्या नावाने लेखी तक्रार देऊनही पोलिस दखल घेत नाहीत. ग्रामपंचायत स्तरावरही अनेक नागरिकांचे अर्ज कारवाईविना पडून आहेत. त्यामुळे उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे.
- संतोष कांदळकर, नुकसानत्रस्त शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Heatwave: नांदेडला १३ एप्रिलपासून तापमानाचा पारा ४० अंशांवर

Crop Insurance : सुधारित पिक विमा योजनेमुळे शेतकरी भरपाईपासून वंचित?

Mumbai Pune Missing Link Project: मुंबई- पुणे प्रवासाचा वेळ ३० मिनिटांनी कमी होणार, 'मिसिंग लिंक' खुला

Fertilizer Shop License Suspension: तीन कृषी केंद्रांचे परवाने रद्द, तर एकवीस निलंबित

India Rainfall Forecast: मे महिन्यात अधिक पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT