Hailstorm Agrowon
ॲग्रो विशेष

Hailstorm Update : सिन्नरच्या पूर्व भागात वादळी वाऱ्यासह गारपीट

सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात वावी परिसरात बुधवारी (ता. २६) दुपारी चारच्या सुमारास प्रचंड वादळ आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली.

Team Agrowon

Nashik News : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात वावी परिसरात बुधवारी (ता. २६) दुपारी चारच्या सुमारास प्रचंड वादळ आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली.

सुमारे चाळीस मिनिटे जोरदार पाऊस झाला. वावी, फुलेनगर, घोटेवाडी, मिठसागरे, पिंपरवाडी परिसरात पालसासह कमी अधिक प्रमाणावर गाराही पडल्या.

परिसरात दोन दिवसांपासून प्रचंड उकाडा जाणवत होता. बुधवारी (ता. २६) सकाळपासूनच ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. दुपारी चारच्या सुमारास पाऊस पडण्याचा कोणताही अंदाज नसताना अचानक नभ दाटून आले अन् वादळासह पावसाला सुरुवात झाली.

परिसरात उन्हाळ कांद्याची काढणी सुरू आहे. शिवाय अनेक शेतकऱ्यांनी टरबूज आदी फळपिकांची लागवड केली आहे. या पिकांना अवकाळीचा फटका बसण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. वादळाचा जोर असल्याने अनेक ठिकाणी झाडे कोलमडून पडली.

अनेक व्यावसायिकांच्या मंडप व शेडचे पत्रे उडाले. पावसाने कांद्याचे अधिक नुकसान होण्याची भीती आहे. गारांमुळे नुकसानीत वाढ होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

पावसाची धास्ती कायम

जिल्ह्यात अनेक ठिकाणी गेल्या पंधरवाड्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे जिल्ह्यात ४३ हजार हेक्टरवर नुकसान झाले. ढगाळ वातावरण व पावसामुळे शेतकऱ्यांनी धास्ती घेतली आहे.

जिल्ह्यात सटाणा, कळवण, मालेगाव, नाशिक, दिंडोरी, चांदवड, येवला तालुक्यात बुधवारी (ता. २६) सायंकाळी व गुरुवारी (ता. २७) सकाळी काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या सरी पडल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pesticide Price Increase : कीटकनाशकांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता; पश्चिम आशियातील तणावामुळे पुरवठा विस्कळीत

Water Storage: देशातील मोठी ४० टक्के धरणे निम्मी रिकामी, महाराष्ट्रात किती पाणीसाठा?

Unseasonal Rain Damage: धाराशिव जिल्ह्यात दीड हजार हेक्टरला पूर्वमोसमीचा फटका

Farmers Agitation: अन्नत्यागातून शेतकऱ्यांप्रति सहवेदना

Paddy Disease: धान पिकावर करपा रोग

SCROLL FOR NEXT