Agriculture Marketing Policy agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Marketing Policy : हरियाणा सरकारच्या निर्णयाने बाजार समित्या संपतील; शेतकरी नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

Haryana CM Nayab Singh Saini : भारतीय किसान संघाचे अध्यक्ष शेतकरी नेते गुरनाम सिंग चढुनी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांची मंगळवारी(ता.३१) भेट घेतली.

sandeep Shirguppe

Agriculture Marketing Policy Haryana : भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष शेतकरी नेते गुरनाम सिंग चढुनी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांची मंगळवारी(ता.३१) भेट घेतली.

या भेटीत राष्ट्रीय कृषी पणन धोरणाच्या मसुद्यावर चर्चा करण्यात आली. सरकारने जारी केलेली अधिसूचना मागे घ्यावी. हरियाणा सरकारने बाजार समित्यांबाबत घेतलेल्या अधिसूचनेबाबत पुन्हा विचार करावा. या अधिसूचनेमुळे बाजार समित्यांऐवजी कुठेही गहू विक्री केला जाऊ शकतो. यामुळे शेतकरी अडचणीत येईल असेही चढू यांनी सांगितले.

सीएम सैनी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत गुरनाम चढू यांनी माहिती दिली, "हरियाणा सरकारने बाजार समित्यांबाबत केलेल्या कायद्यांविरोधात आम्ही बाजार समित्या बंद केल्या होत्या. परंतु, यातून शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने आम्ही हा निर्णय मागे घेतला आहे. आम्ही बाजार समित्या बंद बाबतचे आंदोलन कायम ठेवले असते तर हमाल, कामगारांचे नुकसान झाले असते यातून शेतकऱ्यांना सर्वांनी दोषी धरले असते". असेही चढू यांनी सांगितलं.

गुरनाम चढू पुढे म्हणाले की, "आम्ही ज्या कायद्याविरोधात लढलो होतो तोच कायदा परत आणला जात आहे. असे झाल्यास शेतकऱ्यांचा विश्वासघात होईल. केंद्राकडे याबाबत आम्ही पत्रव्यवहार करणार आहे. अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. हरियाणा सरकारने केंद्राशी बोलून सध्याचे आंदोलन सोडवावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच ऊसदरात वाढ करावी" अशी मागणी चढू यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

डल्लेवाल यांच्या प्रकृतीची चिंता

पंजाब -हरियाणा आंतरराज्य सीमेवर सुरू असलेल्या आमरण उपोषणावर गुरनाम सिंग चढुनी म्हणाले, "जगजीत सिंग डल्लेवाल यांची प्रकृती खालावली आहे. शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात मध्यस्थी करून सुरू असलेले आंदोलन संपवण्यात हरियाणा सरकार महत्त्वाची भूमिका बजावू शकते. शेतकरी खरे प्रश्न मांडत असून सरकारने त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात". असे चढूनी म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सरकीचा भाव तेजीत; कापूस टिकून, सोयाबीनमध्ये चढ उतार, खरबूजाला उठाव तर टोमॅटो आवक टिकून

Orchards Rain Damages: पावसाचा फळबागांचा फटका

khandesh Water Storage: मध्यम, लघु प्रकल्पांत जलसाठा ५० टक्क्यांपर्यंत

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

SCROLL FOR NEXT