Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department : राज्य ठिबक कक्षाच्या उपसंचालकपदी गुंजाळ

State Drip Cell : सूक्ष्म सिंचन योजनांचे एकत्रित नियोजन करणाऱ्या कृषी आयुक्तालयातील राज्य ठिबक कक्षाच्या उपसंचालकपदी संजय भादु गुंजाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मनोज कापडे

Pune News : सूक्ष्म सिंचन योजनांचे एकत्रित नियोजन करणाऱ्या कृषी आयुक्तालयातील राज्य ठिबक कक्षाच्या उपसंचालकपदी संजय भादु गुंजाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे उपसंचालक राम फडतरे येत्या ३० एप्रिल रोजी निवृत्त होतील. त्यानंतर श्री. गुंजाळ या कक्षाची सूत्रे पदोन्नतीने एक मेपासून स्वीकारतील.

फलोत्पादन, रोपवाटिका, मृद्संधारण या विभागांसह अधिकाऱ्यांच्या आस्थापनाविषयक समस्या, क्षेत्रिय पातळीवरील शेतकऱ्यांच्या अडचणींचा त्यांना ३० वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र राज्य कृषी सेवा वर्ग दोन कल्याणकारी संघटनेचे ते साडेतीन वर्ष अध्यक्ष होते. तसेच, राज्यातील सर्व कृषी संघटनांना एका छत्राखाली आणण्यासाठी राज्य कृषी सेवा संघ स्थापन करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता.

महाराष्ट्र कृषी सेवा वर्ग १ च्या १९९१ च्या तुकडीतील श्री.गुंजाळ यांनी दापोलीत फलोत्पादन अधिकारी, रत्नागिरीला रोपवाटिका अधिकारी व अमरावतीला रामेतीचे सहायक संचालक म्हणून कामकाज पाहिले.

त्यानंतर दिंडोरी, जळगाव, देवळा येथे क्षेत्रिय पातळीवरील कृषी योजनांची कामे त्यांनी सांभाळली. कृषी आयुक्तालयातील दक्षता पथकात तंत्र अधिकारी म्हणून त्यांनी उत्तम सेवा बजावली. सध्या ते आयुक्तालयाच्या मृद्संधारण विभागात तंत्र अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

दरम्यान, राज्य शासनाने आणखी दोन तंत्र अधिकाऱ्यांना पदोन्नती दिली आहे. नाशिकचे सध्याचे विभागीय सांख्यिक भिवसेन वारघडे येत्या ३१ मे रोजी निवृत्त होतील. त्यांच्या जागी संजय बाबासाहेब देशमुख यांची पदोन्नतीने सूत्रे स्वीकारतील. दुसरे तंत्र अधिकारी भुजंग राघोबा पवार यांच्या पदोन्नती प्रकरणाची चर्चा सध्या रंगली आहे.

श्री. पवार यांना बीडच्या अंबाजोगाई कृषी विभागात उपविभागीय कृषी अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. सध्या या पदावर शरद शिनगारे कार्यरत असून ते ३१ मे रोजी निवृत्त होत आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, शिनगारे यांच्या आधीच पवार निवृत्त होत असल्यामुळे पदोन्नतीच्या लाभापासून पवार वंचित राहण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, बिनव्याजी कर्ज पुरवठ्याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची महत्त्वाची माहिती

E Crop Survey: पावसाने मोठे नुकसान, पण ‘ई-पीक पाहणी’च नाही!

Revenue Department: महसूल विभागातील तिघे बडतर्फ, तवढेच निलंबित

Oilseed Production: टोकण पद्धतीच्या अवलंबाने तेलबियांच्या उत्पादनात वाढ

Saline Water Problem: सिंचनाच्या पाण्यात क्षार वाढण्याची कारणे आणि त्यावर उपाय

SCROLL FOR NEXT