Banana Farming in Junnar Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Farming: आखाती आयातदारांना जुन्नरच्या केळीची गोडी

Gulf Market for Junnar Bananas: जुन्नर तालुक्यातील निर्यातक्षम केळी पिकांच्या बागांना आखाती देशातील आयात करणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी (ता.११) भेट दिली. मांजरवाडीसह तालुक्यातील विविध ठिकाणच्या केळी पिकाची त्यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली.

गणेश कोरे

Junnar News: जुन्नर तालुक्यातील निर्यातक्षम केळी पिकांच्या बागांना आखाती देशातील आयात करणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी (ता.११) भेट दिली. मांजरवाडीसह तालुक्यातील विविध ठिकाणच्या केळी पिकाची त्यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली.

डेक्कन व्हॅली एफपीसीच्या वतीने सुनील वामन यांनी या पाहणी दौऱ्याचे सादरीकरण केले. यावेळी हस्ताई कोल्ड स्टोअरेजचे गणेश वाघ, शेतकरी कैलास कुटे, मांजरवाडी येथील शेतकरी मुरलीधर थोरात यांच्या शेतावर शेतकरी मेळावा आयोजित केला होता.

या वेळी आखाती देशातील ताबासोम राहे पायतख्त कंपनीचे आखाती देशातील प्रतिनिधी ताबासोम हेमती, मरियम अहमदी, युशा सय्यद, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माऊली खंडागळे, डेक्कन व्हॅली एफपीसीचे संचालक अजय बेल्हेकर, रवींद्र थोरात, विनायक मुळे, किशोर नेहरकर, संतोष काकडे, चंद्रकांत गायकवाड आदी शेतकरी उपस्थित होते.

जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील शेतकरी केळी पिकाकडे वळू लागले आहेत. वर्षभर पाणी मिळण्याचे सिंचनाचे स्रोत व ठिबक सिंचन, मल्चिंग व काटेकोर शेती नियोजन ही जमेची बाजू असलेला इथला शेतकरी मागील दोन वर्षांपासून निर्यातक्षम केळी उत्पादन करत आहे. कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र व डेक्कन व्हॅली शेतकरी उत्पादक कंपनी, सह्याद्री फार्म्स नाशिक, यांच्या माध्यमातून केळी पिकामध्ये एकात्मिक मूल्यसाखळी उभी करण्यासाठी जिल्ह्यातील प्रशासन कामगिरी करीत आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून क्लस्टर डेव्हलपमेंटमधून केळी उत्पादक शेतकऱ्यांना सर्व सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल निर्यात करून त्याचे अधिकाधिक मूल्य शेतकऱ्यांना मिळवून देण्याचा मानस आहे.
माउली खंडागळे, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, जुन्नर
जुन्नर परिसरात एकही औद्योगिक वसाहत नाही. त्यामुळे येथील हवा व पाणी शुद्ध आहे व येथील शेतकरी हा जैविक निविष्ठांचा वापर प्रभावी करत असल्याने भविष्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच चांगले दिवस येतील.
अजय बेल्हेकर, संचालक, डेक्कन व्हॅली एफपीसी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT