sandeep Shirguppe
अकोला जिल्ह्यात केळीच्या उत्पादनात वाढ झाली आहे.
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्याच्या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या दानापूरमध्ये केळी उत्पादन घेतले जाते.
दानापूरचे प्रगतशील शेतकरी मनिष भड यांनी अडीच एकरात ६ ऑगस्ट २०२४ ला केळीची बाग लागवड केली आहे.
केळीच्या बागेचे चांगले संगोपन केल्याने बागेत आता घड पडू लागले आहेत.
कुठल्याही पिकात फळधारणा होणे ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाची बाब असते.
केळीविषयी कृतज्ञता म्हणून परिवारासह केळीच्या बागेत भड कुटुंबांने पूजन केले.
केळीला साडी, खण, नारळ, नैवेद्य वाहला.
मिनल व मनिष भड यांनी सपत्निक पूजन केले.
मिनल व मनिष भड यांच्या कन्येनेही केळीच्या घडाचे पूजन केले. ही सर्व क्षणचित्रे सुनिलकुमार धुरडे यांनी टिपली आहेत.