Cotton Seeds Agrowon
ॲग्रो विशेष

Unauthorized Seeds : अनधिकृत बियाण्यांचे गुजरात कनेक्शन

Seeds Seized : खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी तसेच पोलिस विभागाने पाच ठिकाणी अनधिकृत बियाणे जप्त केले. या प्रकरणाचा तपासांची ’लिंक’ गुजरातपर्यंत पोहोचली आहे.

Team Agrowon

Yavatmal News : खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी तसेच पोलिस विभागाने पाच ठिकाणी अनधिकृत बियाणे जप्त केले. या प्रकरणाचा तपासांची ’लिंक’ गुजरातपर्यंत पोहोचली आहे. विशेष म्हणजे पथकाला या प्रकरणाचे धागेदोरे गवसले असून मोठ्या कारवाईची शक्यता आहे.

खरीप हंगामात दर वर्षी मोठ्या प्रमाणात केंद्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या कापूस बियाण्यांची विक्री होते. बंदीनंतरही जिल्ह्यात बियाणे येत असल्याने संबंधितांवर कारवाई केली जात आहे. गेल्या वर्षी अनेक ठिकाणी कारवाई करून बियाणे जप्त करण्यात आले. यंदाही कृषी तसेच पोलिस विभागाच्या संयुक्त पथकाने पाच ठिकाणी कारवाई केली. यात मोठ्या प्रमाणात शासनाची मान्यता नसलेले बियाणे जप्त करण्यात आले.

या प्रकरणात तक्रारीनंतर स्थानिक गुन्हे शाखेने तपास हाती घेतला. पाचही प्रकरणातील आरोपीची चौकशी करण्यात आली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ‘लिंक’ जोडण्यात आली. मान्यता नसलेल्या प्रकरणाची ‘लिंक’ थेट गुजरातपर्यंत जाऊन पोहोचली आहे. पोलिसांचे पथक गुजरातपर्यंत जाऊन आले.

मिळालेल्या माहितीच्या आधारे सर्व शहानिशा केली आहे. या प्रकरणात मोठा मासा पोलिसांच्या गळ्याला लागण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी तयारी सुरू केल्याची माहिती आहे. तांत्रिक बाबीची पूर्तता करून प्रतिबंधित बियाणे प्रकरणात कारवाईची शक्यता आहे. जिल्ह्यात मागणी असलेले बियाण्याचा तुटवडा निर्माण केला जात आहे.

लाखोंचा माल ताब्यात

शासनाने प्रतिबंधित केलेल्या बियाणे विक्रीवर पाटण, वडकी, शिरपूर, मारेगाव व त्यानंतर दारव्हा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहे. लाखो रुपयांचे बियाणे जप्त करण्यात आले आहे. दारव्हा येथील एकाच कारवाईत साडेसहा लाख रुपयांचे बियाणे जप्त करण्यात आले. आतापर्यंतची जिल्ह्यात दाखल झालेल्या बियाणे पाकिटांची संख्या मोठी आहे.

शासनाने प्रतिबंधित केलेल्या बियाणे प्रकरणाचा तपास टोकापर्यंत पोहोचला आहे. बियाण्यांची ’लिंक’ हाती आली आहे. तांत्रिक कारणांची पूर्तता करून कारवाई निश्‍चितच केली जाणार आहे.
आधारसिंग सोनोने, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT