Fertilizer Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer Linking : खत लिकिंगबाबत कारवाईच्या सूचना

Kharif Season : खत कंपन्या लिंकिंगशिवाय वितरकांना खते देत नाहीत. खत कंपन्या लिंकिंग करीत असल्याने पुढे लिकींगची खते शेतकऱ्यांच्या माथी मारली जातात.

Team Agrowon

Jalgaon News : जिल्ह्यात खतांवर खतपुरवठादार कंपन्याच लिंकिंग करीत आहेत. लिंकिंगशिवाय मुख्य संयुक्त खते मिळत नसल्याने अडचणी आहेत. लिंकिंग करणाऱ्या खत कंपन्यांवर कारवाई करावी, संबंधितांना तंबी दिली जावी, अशा सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी खरीप आढावा बैठकीत दिला.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात ही बैठक झाली. त्यात पालकमंत्री पाटील यांच्यासह आमदार आमोल जावळे, अमोल पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कर्बान तडवी, कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के, विजय पवार, विनोद तराळ यासह अधिकारी उपस्थित होते.

यात खतांच्या लिकींगची समस्या माफदाचे विनोद तराळ यांनी मांडली. खत कंपन्या लिंकिंगशिवाय वितरकांना खते देत नाहीत. खत कंपन्या लिंकिंग करीत असल्याने पुढे लिकींगची खते शेतकऱ्यांच्या माथी मारली जातात. यात शेतकरी व कृषी केंद्रचालक यांच्यात वाद होतात. पण या समस्येला खत कंपन्या जबाबदार आहेत.

यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा मुद्दा तराळ यांनी मांडला. त्यावर पालकमंत्री पाटील यांनी खत कंपन्यांनी लिंकिंग करू नये. तसे केल्यास संबंधित कंपनीचा पुरवठा बंद करण्याचा, शक्य ती प्रशासकीय कारवाई करण्याचा निर्णय घेतला जाईल. या वेळी खत कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. अनेक खत कंपन्यांचे अधिकारी अनुपस्थित असल्याने संबंधितांना कारणे दाखवा नोटीस देण्याचा निर्णयही झाला.

वीजपुरवठा सुरळीत हवा

पुढे जिल्ह्यात कापूस लागवड सुरू होईल. अन्य बागायती पिके आहेत. या काळात शिवारात वीजपुरवठा सुरळीत हवा आहे. नियोजन समितीतून अधिकाधिक रोहित्र देण्याचा प्रयत्न झाला. परंतु या काळात वीजपुरवठा शिवारात सुरळीत हवा. शेतकऱ्यांच्या तक्रारी यायला नकोत. अडचणी असल्यास त्याबाबतही खुलासा करावा. शेतकऱ्यांनी फोन केल्यास त्यास प्रतिसाद द्यावा, अशा सूचनाही पालकमंत्री पाटील यांनी दिल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: कृषी शिक्षण, संशोधनावरील तरतूद वर्षागणिक तोकडीच

Bharat-VISTAAR AI: अर्थसंकल्पातून 'भारत विस्तार एआय'ची घोषणा, याचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Sandlwood Cultivation : चंदन लागवडीसाठी अर्थसंकल्पात तरतूद; पाच राज्यांमध्ये चंदनाची सर्वाधिक लागवड

Groundwater Management: सर्व विभागाच्या समन्वयातून भूजल व्यवस्थापनाची गरज

Union Budget 2026: कृषी, ग्रामीण उद्योगासह शेतकरी हिताचा संकल्प

SCROLL FOR NEXT