Group Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Group Farming : गावाच्या प्रगतीसाठी गट शेती महत्त्वाची

Village Development : शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आर्थिक विकास करावा यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट निर्माण करावा.

Team Agrowon

Kolhapur News : शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आर्थिक विकास करावा यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट निर्माण करावा. या गटाने एक पीक घेऊन विपणन व्यवस्थेपर्यंत त्याचे नियोजन करावे.

जेणेकरून गावाच्या प्रगतीसाठी गट शेती फायदेशीर ठरेल, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विठ्ठलराव शिर्के यांनी केले. अखिल भारतीय संशोधन परिषद-भारतीय मका संशोधन संस्था, लुधियाना व मका संशोधन प्रकल्प, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने वारणुळ फाटा, कुंभारवाडी (ता. पन्हाळा) येथे आयोजित मका पीक शेतकरी मेळाव्यात डॉ. शिर्के बोलत होते.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य दत्तात्रय उगले विभागीय कृषी संशोधन केंद्र, कोल्हापूरचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. अशोक पिसाळ आदींची भाषणे झाली. प्रास्ताविक मका पैदासकार डॉ. सुनील कराड यांनी केले. कृषिभूषण सर्जेराव पाटील, निवास कुंभार, बबन शिंदे, आर. एस. चौगुले यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.

रब्बी २०२४ या हंगामाकरिता लाभार्थी शेतकऱ्यांना मका हायब्रीड बियाणे, फुले मायक्रो न्युट्रीयांट ग्रेड-२, श्री सुगीचे वितरण करण्यात आले. विभागीय कृषी संशोधन केंद्रातील मृदा शास्त्रज्ञ डॉ. प्रवीण गजभिये, राजर्षी शाहू कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष नेवरे, वरिष्ठ तंत्रज्ञ डॉ. मयुर सुतार, कळे येथील मंडल कृषी अधिकारी टी. एन. खोत, कृषी सहायक सुनीता कुंभार उपस्थित होते.

सूत्रसंचालन सहायक मका कृषी विद्यावेत्ता डॉ. सुहास भिंगारदेवे यांनी केले. आभार सागर शेळके यानी मानले. वरिष्ठ संशोधन सहायक सुशांत महाडिक, आशिष पाटील, पूजा चव्हाण, प्रतीक्षा पाटील, भाऊ पोवार, आर्यन टोनपी यांनी परिश्रम घेतले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

MKCL Investment: ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Market License Cancellation: पणन संचालकांचा खासगी बाजारांवर कारवाईचा धडाका; ‘रामेश्वर, ‘कसमादे’, ‘जय गजानन’ बाजारांचे परवाने रद्द

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT