Groundnut Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Groundnut Harvesting : खानदेशात भुईमूग पीक येतेय काढणीवर

Groundnut Production : खानदेशात भुईमूग पिकाची लागवड यंदा बऱ्यापैकी झाली होती. आगाप क्षेत्रात पीक काढणीवर येत आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात भुईमूग पिकाची लागवड यंदा बऱ्यापैकी झाली होती. आगाप क्षेत्रात पीक काढणीवर येत आहे. सध्या पिकात सिंचनासह तणनियंत्रणाची लगबग सुरू आहे. खानदेशात जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक ८०० हेक्टरवर भुईमुगाची पेरणी झाली होती.

ही पेरणी चोपडा, जामनेर, पाचोरा, अमळनेर, यावल, चाळीसगाव, भडगाव, पाचोरा आदी भागात झाली होती. पेरणी किंवा लागवड डिसेंबरमध्येच सुरू झाली. पीक अनेक भागात साडेतीन ते चार महिन्यांचे झाले आहे. अनेकांनी उष्णतेचा एप्रिलमधील प्रकोप व अन्य समस्या लक्षात घेवून आगाप लागवड केली होती.

काही भागात पीक पक्व होत असून, काढणीवर येत आहे. तर अनेक भागात पीक वाढीच्या अवस्थेत आहे. भुईमुगाची धुळ्यातील लागवड यंदा स्थिर आहे. तेथे सुमारे ४०० हेक्टरवर भुईमूग आहे. तर नंदुरबारातही सुमारे २०० हेक्टरवर भुईमूग पीक आहे. सातपुडा पर्वतालगत भुईमूग पीक आहे. यंदा पाऊसमान चांगले राहील्याने भुईमूग लागवड वाढली.

सातपुडा पर्वतालगतचा भाग भुईमूग पिकासाठी प्रसिद्ध आहे. परंतु यासह अन्य क्षेत्रातही भुईमूग पीक वाढले आहे. धुळ्यातील साक्री, धुळे भागातही भुईमूग पीक बऱ्यापैकी आहे. तर जळगावातील चाळीसगाव, भडगाव भागात भुईमूग पीक वाढू लागले आहे.

पूर्वी जळगाव जिल्ह्यातील यावल, चोपडा या भागात भुईमूग पीक अधिक असायचे. परंतु अलीकडे भुईमूग पीक सर्वत्र पोचले आहे. पिकात पुढील महिन्यात काढणी सुरू होईल. भुईमूग काढणीसाठी काही गावांत पारंगत मजूर उपलब्ध आहेत. त्याची जुळवाजुळव शेतकरी करीत आहेत.

सूक्ष्मसिंचनाने दिलासा

अनेक शेतकऱ्यांनी कापूस पिकाखालील क्षेत्र रिकामे करून त्यात डिसेंबरमध्ये भुईमूग लागवड केली होती. यंदा थंडी कमी राहीली. तसेच फेब्रुवारीतच उन्हाचे चटके वाढले. उष्ण वातावरणाचा लाभ भुईमूग पिकास झाल्याचे शेतकरी सांगतात. अनेकांचे पीक अंतिम स्थितीत असून, त्यात अखेरचे सिंचन केले जात आहे.

कमाल शेतकऱ्यांनी ठिबक, तुषार सिंचनाच्या मदतीने भुईमूग लागवड केली आहे. ठिबक, तुषार सिंचनाच्या मदतीने सिंचन झालेल्या भुईमूग पिकाची वाढ चांगली आहे. पाट पद्धतीनेदेखील काही शेतकरी सिंचन करीत आहेत. काही भागात तण सतत वाढले. या स्थितीत शेतकऱ्यांनी तणनाशकांचा उपयोग पिकात टाळला. मजुरांकरवी तण काढून घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: कांदा दर नरमले; सोयाबीन- कापूस दर टिकून, मक्याचे दर स्थिर तर आल्याला उठाव

Shaktipeeth Expressway: देवदेवतांच्या नावाखाली कशाला वरवंटा फिरवताय?; शक्तिपीठ महामार्गाच्या नव्या प्लॅनवर राजू शेट्टींचा सवाल

Maharashtra Weather Update: राज्यात ढगाळ हवामानाचा अंदाज; राज्यातील थंडीचा कडाका काहीसा कमी होण्याची शक्यता 

Sand Mining: प्रमुख नद्यांचा प्रवाह थांबला; वाळूउपसा सुरू

Agriculture Awards: भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठानचा तीन शास्त्रज्ञांना राज्यस्तरीय पुरस्कार

SCROLL FOR NEXT