ॲग्रो विशेष

Water Level : परभणी जिल्ह्यातील भूजलपातळी खालावली

Water Crisis : परभणी जिल्ह्यातील भूजल पातळी ३.१३ ते ७.५० मीटर खोल असल्याचे आढळून आले आहे.

Team Agrowon

Parbhani News : भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतर्फे यंदाच्या (२०२३) ऑक्टोबरमध्ये घेण्यात आलेल्या निरीक्षण विहिरीतील नोंदीनुसार जिल्ह्यातील भूजल पातळी ३.१३ ते ७.५० मीटर खोल असल्याचे आढळून आले आहे.

पालम तालुक्यातील भूजल पातळी सरासरी पातळीच्या तुलनेत उणे ०.३६ मीटर खोल गेली आहे. वाढत्या उपशामुळे भूजल पातळी खालावत आहे. येत्या काळात अनेक गावात पाणीटंचाईची समस्या गंभीर होऊ शकते, याचे संकेत आतापासूनच दिसू लागले आहेत.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेअंतर्गत वरिष्ठ भू वैज्ञानिक कार्यालयातर्फे जिल्ह्यातील ८६ निरीक्षक विहिरींतील पाणीपातळीच्या नोंदी घेतल्या जातात. यंदा जून, जुलै, ऑगस्ट महिन्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. जून ते ऑक्टोबर या कालावधीत सरासरीच्या तुलनेत ३१५ मिलिमीटरची तूट आली. जमिनीत अत्यंत कमी प्रमाणात पाणी मुरले. ऑक्टोबरमध्ये सेलू तालुक्यातील भूजल पातळी सर्वाधिक ७.५० मीटर, तर पूर्णा तालुक्यातील सर्वांत कमी ३.१३ मीटरवर आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT