Karnataka Drought Condition agrowon
ॲग्रो विशेष

Karnataka Drought Condition : केंद्रीय पथकासमोर शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार?

Drought Condition : कर्नाटकातील १९५ गावांना दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केल्यानंतर केंद्रीय दुष्काळ अभ्यास पथक पाहणी केली.

sandeep Shirguppe

Karnataka News : कर्नाटकातील १९५ गावांना दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केल्यानंतर केंद्रीय दुष्काळ अभ्यास पथक पाहणी केली. या पार्श्वभूमीवर विधानसौध येथे महसूलमंत्री कृष्णा भैरेगौडा यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली. केंद्रीय दुष्काळ अभ्यास पथकात १० सदस्यांनी पाहणी करून अहवाल केंद्राकडे अहवाल सादर करण्यात आला.

पावसाअभावी कर्नाटकातील अनेक जिल्ह्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे सहसचिव अजितकुमार साहू नेतृत्वाखालील पाच अधिकाऱ्यांच्या पथकाने पाहणी केली. काल शुक्रवारी (दि. ६) जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित विभागाचे अधिकारी यांच्याशी चर्चा करून दुष्काळग्रस्त भागाला भेटी देऊन पाहणी केली.

बैलहोंगल तालुक्यातील सरगी जवळील नागप्पा हबी यांच्या शेतात सुरुवातीला सोयाबीन पिकाचे नुकसान झाले, तर कुंतीगेरी यांच्या शेतातील राजू होंगळ व बसप्पा यांच्या गाजर पिकाचे नुकसान झाले. एकरी ५२ हजार तर दोन एकरावर एक लाखाहून अधिक खर्च झाला आहे. बियाणे-खतावर एकरी २५ हजार खर्च झाल्याची व्यथा बसप्पा कुंतीगेरी यांनी व्यक्त केली.

नेसरगी परिसरातच २९५ हेक्टर क्रेटची पेरणी झाली आहे. उत्पन्नाची पूर्ण नासाडी झाल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. प्रत्येक शेतकऱ्याने पाच ते सहा एकर क्रेटची पेरणी केली त्या पिकांचे नुकसान झाल्याने ते अडचणीत आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

पथकातील संघप्रमुख व सदस्यांनी स्वतः शेतकऱ्यांशी चर्चा करून पिकांच्या नुकसानीची माहिती गोळा केली. यानंतर मीराप्पा हुक्केरी त्यांच्या बारा एकर सोयाबीन पिकाच्या नुकसानीची पाहणी केली.

एकरी बारा लाख उत्पन्न मिळायला हवे होते. पावसाअभावी पूर्ण नुकसान झाले. हलक्या पावसामुळे ते हिरवेगार आहे. पण उत्पन्न मिळत नाही, असे स्पष्टीकरण कमलवा नडहट्टी या शेतकरी महिलेने दिले. चाचडी येथे वीरभद्रप्पा होसमनी यांच्या दीड एकर सूर्यफूल पिकाचे नुकसान झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT