Agriculture Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : येवला तालुक्याच्या उत्तर पूर्व भागात सिंचनात होणार वाढ

Irrigation Project : येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागाला जलसंजीवनी देणाऱ्या ममदापूर साठवण तलाव योजनेच्या १५ कोटी ९८ लक्ष रुपयांच्या अंदाजपत्रकास मृद व जलसंधारण विभागाकडून सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

Team Agrowon

Nashik News : येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागाला जलसंजीवनी देणाऱ्या ममदापूर साठवण तलाव योजनेच्या १५ कोटी ९८ लक्ष रुपयांच्या अंदाजपत्रकास मृद व जलसंधारण विभागाकडून सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच या तलावाचे उर्वरित काम पूर्ण होऊन येवला तालुक्यात उत्तर पूर्व भागातील सिंचनात मोठी वाढ होणार आहे.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून येवला तालुक्यातील ममदापूर येथे ममदापूर साठवण तलावास मंजुरी मिळाली आहे. ममदापूर साठवण तलाव वनविभागाच्या २८.०६ हेक्टरवर साकारण्यात येत असून वनविभागाची मंजुरी मिळून प्रकल्पाचे काम देखील सुरू आहे.

या योजनेच्या अंदाजपत्रकात वाढ झाल्याने सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव शासनास सादर करण्यात आलेला होता. या प्रस्तावास मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने मंजुरी देण्यात आली असून यासाठी १५ कोटी ९८ लाख रुपयांचा निधीस मंजुरी देण्यात आला आली आहे.

असा होणार फायदा

साठवण तलाव ममदापूर ही योजना ममदापूर गावाजवळील तापी नदीच्या स्थानिक नाल्यावर प्रस्तावित आहे. या तलावाचे पाणलोट क्षेत्र १८ चौरस किलोमीटर आणि एकूण क्षमता ही ३५.६७ द.ल.घ.फु इतकी असणार आहे.

या धरणाची लांबी २२० मीटर तर सांडव्याची लांबी ही ७९ मीटर इतकी प्रस्तावित आहे. बंधाऱ्यामुळे ममदापूर परिसरातील जमीन ओलिताखाली येणार असून शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार असून साठवण तलावाचा ममदापूर राखीव संवर्धन क्षेत्रातील वन्य जीव आणि प्राण्यांनाही पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT