Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Bogus Pesticide : बोगस कीटकनाशकामुळे द्राक्षासह खरबुजाला फटका

Crop Damage : पंढरपूर तालुक्यातील कासेगाव, अनवली, पुळूज तसेच मोहोळ तालुक्यातील आढेगाव भागातील द्राक्षासह खरबूज, कलिंगडावर बोगस कीटकनाशक फवारल्यामुळे मोठा फटका बसला आहे.

सुदर्शन सुतार

Solapur News : पंढरपूर तालुक्यातील कासेगाव, अनवली, पुळूज तसेच मोहोळ तालुक्यातील आढेगाव भागातील द्राक्षासह खरबूज, कलिंगडावर बोगस कीटकनाशक फवारल्यामुळे मोठा फटका बसला आहे.

त्यामुळे या भागातील सुमारे ५० एकरांवरील पिकांचे नुकसान झाले आहे. अवेळी पावसासह विविध समस्येने आधीच त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या संकटात या नव्या आपत्तीची भर पडली आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. तसेच सकाळी धुके, संध्याकाळी थंडी अशा वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक धास्तावले आहेत. त्यातच गेल्या आठवड्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसानेही मोठे नुकसान केले आहे.

धुक्यासह थंडीच्या वातावरणामुळे कीड-रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने या भागातील अनेक शेतकऱ्यांनी द्राक्षासह खरबूज, कलिंगडावर एका नामांकित कंपनीच्या कीटकनाशकाची फवारणी केली.

पण त्याचा रोगनियंत्रणावर प्रभाव दिसून येण्याऐवजी थेट द्राक्ष बागा आणि खरबुजाचे नुकसान झाले. एकाचवेळी या भागात हा प्रकार झाल्याने बहुधा एकाच बॅचच्या पॅकिंगचे कीटकनाशक या सर्वांकडून फवारणी झाल्याचे दिसते.

त्यामुळेच पंढरपुरातील कासेगावसह मोहोळ तालुक्यातील आढेगाव भागातील शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागा अक्षरशः जळून गेल्या आहेत. तसेच खरबूज, कलिंगडही जळून गेल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत.

प्रामुख्याने अनवली येथील पोपट शिवदास घोडके, समाधान अर्जुन घोडके, पांडुरंग शिवाजी कदम, धनाजी जनार्दन देशमुख, कासेगाव येथील वसंत दामू शिंदे, सदाशिव बाबा गवळी, अजिंक्य तानाजी देशमुख, अक्षय तानाजी देशमुख, नेहाल नेताजी देशमुख, संकेत सयाजी देशमुख, मोहोळ तालुक्यातील राजाराम बारबोले (रा. आढेगाव) यांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच द्राक्ष बागायतदार संघाचे सोलापूर विभागाचे अध्यक्ष प्रशांत देशमुख, प्रणव परिचारक यांनी नुकसानग्रस्त बागांना भेट देऊन पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी चर्चा केली.

पंढरपूर तालुक्यातील द्राक्ष बागायतदारांना यापूर्वीही मोठा फटका अशा बोगस कीटकनाशकामुळे बसला आहे. कृषी विभागासह संबंधित यंत्रणांना याची पूर्वकल्पना आहे, तरीही अशी बोगस कीटकनाशके बाजारात कशी येतात, संबंधित कंपन्यांच्या उत्पादनावर बंदी घालावी, तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू.
- प्रशांत देशमुख, विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT