Sanjana Hebbalkar
केंद्रीय कृषी मंत्रालयाने देशात नोंदणीकृत चार कीटकनाशकांचा वापर, विक्री व वितरणास मनाई करणारा आदेश सरकारी गॅझेटमधील प्रसिद्धीद्वारे जारी केला आहे.
त्यात तीन कीटकनाशके व एका बुरशीनाशकाचा समावेश आहे. या निर्णयाची अंमलबजावणी ३ ऑक्टोबर २०२३ पासून सुरू झाली आहे.
ज्या कृषी रसायन कंपन्यांकडे संबंधित प्रमाणपत्रे असतील त्यांना ती परत करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.
आदेशाची अंमलबजावणी करणे प्रत्येक राज्य सरकारला आवश्यक आहे.
हे एक कीटकनाशक व कोळीनाशक आहे. हे एक माइटिसाईड आहे जे कोळ्याविरोधात प्रभावी ठरतं.
हे एक बुरशीनाशक आहे. हे अनेक पिकांवर पावडर बुरशीचे नियंत्रण करण्यासाठी वापरलं जातं.
हे एक कीटकनाशक आहे. हे भाजीपाला आणि फळबागांच्या पिकांसह खाद्य पिकांवर झाडाची पाने आणि कीटकांवर नियंत्रणासाठी वापरली जाते.