Grape Merchant Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Market : नाशिक जिल्ह्यातील खानगाव नजिक, उगाव केंद्रांवर आजपासून द्राक्षमणी लिलाव

Grape Auction : निफाड तालुक्यातील खानगाव नजीक व उगाव परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या सोयीसाठी लासलगाव बाजार समितीच्या तात्पुरत्या न खरेदी-विक्री केंद्रांवर बुधवारपासून (ता. १२) द्राक्ष लिलावास प्रारंभ होणार असल्याची माहिती बाजार समितीकडून देण्यात आली.

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा

Nashik News : नाशिक : निफाड तालुक्यातील खानगाव नजीक व उगाव परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या सोयीसाठी लासलगाव बाजार समितीच्या तात्पुरत्या न खरेदी-विक्री केंद्रांवर बुधवारपासून (ता. १२) द्राक्ष लिलावास प्रारंभ होणार असल्याची माहिती बाजार समितीकडून देण्यात आली.

नांदगाव, डोंगरगाव, रूई, धानोरे, कोळगाव, खेडलेझुंगे, धारणगाव, नांदूरमध्यमेश्वर, नैताळे, श्रीरामनगर, शिवरे, वनसगाव, खडक माळेगाव, सारोळे खुर्द आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर द्राक्षांची लागवड आहे. शेतकऱ्यांना उत्पादित शेतीमाल विक्री जवळच करता यावी, यासाठी लासलगाव बाजार समिती दरवर्षी खानगाव नजीक, उगाव, नैताळे आणि मानोरी खुर्द येथे खरेदी-विक्री केंद्र सुरू करते. यंदाही स्थानिक शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने खानगाव व उगाव येथे बुधवारपासून (ता. १२) द्राक्ष लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

बाजार समितीने केलेल्या या नियोजनामुळे शेतकऱ्यांना बाजारपेठेपर्यंत सहज प्रवेश मिळणार असून, अधिकाधिक व्यापारी सहभागी झाल्याने द्राक्ष उत्पादकांना चांगल्या दरांचा लाभ होईल. त्यामुळे शेतकरी व व्यापारी बांधवांनी अधिकृत खरेदी-विक्री केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन लासलगाव बाजार समिती प्रशासनाने केले आहे.

शेतकऱ्यांनी बुधवारपासून दररोज दुपारी ४ ला योग्य प्रतवारी केलेली द्राक्षमणी विक्रीसाठी आणावेत, असे आवाहन बाजार समितीने केले आहे. विक्री झाल्यानंतर वजनमापनानंतर त्वरित रोख पेमेंट देण्याची व्यवस्था बाजार समितीने केली आहे. याशिवाय, अधिक व्यापारी सहभागी होणार असल्याने स्पर्धात्मक लिलावातून शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळण्याची संधी आहे. खानगाव नजीक व उगाव खरेदी-विक्री केंद्रांवर द्राक्ष खरेदीस इच्छुक व्यापाऱ्यांसाठी पॅकिंग व साठवणीसाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी लासलगाव बाजार समितीच्या मुख्य कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी केले आहे.

विनापरवाना शिवार खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई

बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात विनापरवाना शिवार खरेदी करणाऱ्या द्राक्ष खरेदीदारांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी फक्त अधिकृत खरेदी-विक्री केंद्रांवरच माल विक्री करावा, असे आवाहन बाजार समिती सदस्य मंडळाने केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Empowerment: सामाजिक समावेशकतेतूनच स्त्रीशक्तीचा जागर

Market Committee: बाजार समित्यांचे नसते उद्योग

Farmer Protest: शेतकरी कर्जमाफी, ओला दुष्काळ जाहीर करा

Crop Insurance Compensation: तातडीने विमा भरपाईसाठी कंपन्यांना निर्देश देऊ

APMC Pune: शेतीमाल प्रक्रिया मूल्यवर्धन प्रकल्प उभारणार

SCROLL FOR NEXT