Grape  Agrowon
ॲग्रो विशेष

Non-patented Varieties : नॉन पेटंटेड वाणांसाठी द्राक्ष संघाचा पुढाकार

Grape Association : बाजारात उपलब्ध असणाऱ्या नॉन पेटेंडेड वाणांच्या लागवडीसाठी काडी घेताना एकरी ६० ते ७० हजार असा खर्च आहे.

Team Agrowon

Nashik News : उपलब्ध पेटंटेड द्राक्ष वाण हे ठरावीक निर्यातदार व सभासदांकडे लागवडीसाठी आहेत. त्यांच्या लागवड विस्तारास मर्यादा आहेत. त्यामुळे बाजारात उपलब्ध असणाऱ्या नॉन पेटेंडेड वाणांच्या लागवडीसाठी काडी घेताना एकरी ६० ते ७० हजार असा खर्च आहे.

त्यासाठी सर्वच द्राक्ष उत्पादकांची आर्थिक स्थिती नाही. तसेच काड्यांची उपलब्धता होण्यास मर्यादा आहेत. त्यामुळे बाजारपेठेत मागणी असणाऱ्या नॉन पेटेंडेड वाणांची सर्वसामान्य द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी उपलब्धता व्हावी, या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने पावले उचलली असून कृती कार्यक्रम हाती घेतला आहे.

ओझर मिग (जि. नाशिक) येथील संघाच्या विभागीय कार्यालयात आंतरराष्ट्रीय द्राक्ष तज्ज्ञ रॉड्रीगो ओलिवा, तसेच द्राक्ष बागायतदार संघाची राज्याची कोअर कमिटीच्या उपस्थितीत नुकतीच राज्यस्तरीय बैठक झाली. त्यामध्ये चर्चा करण्यात आली. त्यामुळे द्राक्ष पीक संबंधित सेवा, निविष्ठा विक्री यासह नॉन पेटंटेंड द्राक्ष वाणांची उपलब्धता सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी होण्यासाठी पाऊल उचलले आहे.

बैठकीला आंतरराष्ट्रीय द्राक्षतज्ज्ञ रॉड्रीगो ऑलिवा, द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले उपाध्यक्ष मारुती चव्हाण, कोशाध्यक्ष शिवाजी पवार, मध्यवर्ती विज्ञान समितीचे अध्यक्ष अभिजित कांचन, नाशिक विभागाचे अध्यक्ष बाळासाहेब गडाख, सांगली विभागाचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील, पुणे विभागीय अध्यक्ष सुरेश कडलग,

सोलापूर विभाग अध्यक्ष राजेंद्र देशमुख नाशिक विभागाचे मानद सचिव बबनराव भालेराव, सोलापूरचे शंकर येनगुरे, सांगलीचे तुकाराम माळी, पुणेचे गणेश सांगळे, संघाचे माजी अध्यक्ष डी. बी. मोगल, सोपान कांचन, डॉ. जयराम खिलारी, महेंद्र शाहीर, अशोक गायकवाड, सुभाष आर्वे, माजी पदाधिकारी अनिल मेहेर, अरुण मोरे, दाभोळकर प्रयोग परिवाराचे मुख्य समन्वयक वासुदेव काठे, हरिश मोरे आदी उपस्थित होते.

राज्यात जवळपास साडेचार लाख एकर द्राक्ष शेती आहे. संघाने दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या परिस्थितीत एक लाख एकरापर्यंत पेटंटेड द्राक्ष वाणांचे क्षेत्र विस्तारू शकते; मात्र उर्वरित साडेतीन लाख क्षेत्रावरील द्राक्ष उत्पादकांना खर्च व नॉन पेटंटेड द्राक्ष वाणांची उपलब्ध करण्यासाठी हा पुढाकार घेण्यात आला असल्याचे अध्यक्ष कैलास भोसले यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय पातळीवर रॉड्रीगो यांच्या माध्यमातून नॉन पेटेंडेड वाणांच्या उपलब्धतेसाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

बैठकीतील मुद्दे :

बाजारात मागणी असलेले कमी खर्चात नॉन पटेंटेड वाणांची उपलब्धता होणार.

वातावरण, जमिनीचा पोतनुसार नॉन पटेंडेड वाणांची निवड.

रंगीत, काळी व सफेद यांसह बेदाणासाठी उपयुक्त वाणांची मागणी.

निवड झालेल्या वाणांची प्रात्यक्षिक प्रक्षेत्रावर लागवड करून चाचण्या घेऊन निष्कर्ष आल्यानंतर लागवडीसाठी दिल्या जाणार.

यासह राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र तसेच पूर्वी कॅलिफोर्निया, इस्राईल येथील कृषी संशोधन संस्थेशी झालेल्या सामंजस्य करारानुसार त्यांच्या वाणांचीही प्रक्षेत्रावर लागवडी करून चाचण्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Scheme: पशुपालकांसाठी महत्त्वाची योजना; मिळणार शून्य टक्के व्याजावर ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Irrigation Water Management Projects: सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पातर्फे शेतकऱ्यांना तुषार संच वितरित

Fishermen Relief: मच्छीमारांना दिलासा; पाच जिल्ह्यांतील केंद्रांचे आधुनिकीकरण

Rural Water Crisis: चाळीस गावांची पाण्यासाठी वणवण

PMGSY: 'पंतप्रधान ग्राम सडक योजने'ला २०२८ पर्यंत मुदतवाढ, ८३,९७७ कोटींची तरतूद, ग्रामीण वाड्या- वस्त्या शेती बाजारपेठांशी जोडणार

SCROLL FOR NEXT