POCRA Project Agrowon
ॲग्रो विशेष

POCRA Scheme : ‘कृषी संजीवनी’अंतर्गत साडेचार हजार लाभार्थ्यांना अनुदान

POCRA Subsidy : राज्य शासनाने अत्याधुनिक शेती, नवनवीन प्रयोग, फळबाग लागवड आदींना चालना देतांना शेती शाश्‍वत विकासासाठी १७ फेब्रुवारी २०२२ ला नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची (पोकरा) घोषणा केली.

Team Agrowon

Malegaon News : राज्य शासनाने अत्याधुनिक शेती, नवनवीन प्रयोग, फळबाग लागवड आदींना चालना देतांना शेती शाश्‍वत विकासासाठी १७ फेब्रुवारी २०२२ ला नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची (पोकरा) घोषणा केली.

तत्कालीन कृषिमंत्री दादा भुसे यांच्या प्रयत्नांनी तालुक्यातील सर्व १४१ गावांचा या प्रकल्पामध्ये समावेश झाला. तालुक्यातील ४ हजार ४४२ लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत २०२२-२३ व २०२३-२४ या दोन आर्थिक वर्षात शेती विकासाच्या विविध घटकांसाठी ५४ कोटी ५७ लाख ६ हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले.

तालुक्यातील सुमारे साडेचार हजार लाभार्थ्यांना या अनुदानातून ठिबक सिंचन, शेततळे, अस्तरीकरण, शेतीशाळा, फळबाग लागवड, पाणी उपसा साधणे, शेडनेट, रेशीम उद्योग, तुषार सिंचन आदी कामे केली.

‘पोकरा’ योजनेअंतर्गत लाभार्थी व अनुदान स्थिती

घटक नाव अनुदान रक्कम लाभार्थी संख्या

ठिबक सिंचन १५ कोटी ९ लाख २४४२

फळबाग लागवड ४ कोटी ८ लाख १६७६

शेडनेट ३४ कोटी २०४

वैयक्तिक शेततळे १ कोटी ३ लाख ९१

शेततळे अस्तरीकरण २० लाख २२

रेशीम उद्योग ७ लाख १६

शेतीशाळा १९ लाख ७

तुषार सिंचन ७२ लाख ३

पाणी उपसा साधणे १५ लाख १

या प्रकल्पात तालुक्यातील सर्व १४१ गावांचा समावेश झाला ही समाधानाची बाब आहे. योजनेसाठी कृषी विभागातील अधिकाऱ्यांसह सर्व घटकांना प्रशिक्षण देण्यात आले होते. शेडनेट, ठिबक सिंचन यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीला हातभार लागला.
-गोकूळ अहिरे, उपविभागीय कृषी अधिकारी, मालेगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

Bio Tech Farming : ‘के. बी. बायो’च्या वनस्पतिजन्य पीक संरक्षण तंत्रज्ञानाला मान्यता

Land Records Update: जमीन मालकी कायद्याची सिंधुदुर्गातून अंमलबजावणी

Khandesh Rain Update: खानदेशात पावसाची विश्रांती

SCROLL FOR NEXT