Solapur News: महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाच्या वतीने आयोजित १२ वी ऊस परिषद शुक्रवारी (ता. २८) पेठ (ता. वाळवा, जि. सांगली) येथे होत असून यानिमित्ताने ऊस प्रदर्शन, उसावरील विविध प्रकारच्या मार्गदर्शनासह संघाच्या वतीने राज्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांसह कृषी पत्रकारांना देण्यात येणाऱ्या ऊसकार्य गौरव पुरस्कारांचे वितरणही होणार आहे. ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष अतुल माने पाटील, संयोजक युवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पेठ येथील शिराळा रोडवरील जनाई गार्डन येथे सकाळी अकरा वाजता शेतकरी संघटनेचे नेते, रघुनाथदादा पाटील यांच्या हस्ते आणि केळी उत्पादक संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल. ऊसतज्ज्ञ सुरेश उबाळे, जैन इरिगेशनचे शामकांत पाटील, महेंद्र घाटगे, अनंत निकम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, कृषी उपसंचालक नामदेव परिट, कृषी अधिकारी संजय पाटील, सचिन पाटील, आशिष पाटील हे मान्यवर या वेळी मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन माने पाटील यांनी केले आहे.
ऊसभूषण, ऊसकार्य गौरव, ऊससंदेश पुरस्कार या परिषदेच्या निमित्ताने दरवर्षी ऊस उत्पादक संघाकडून प्रगतिशील शेतकऱ्यांना ऊसकार्य गौरव, ऊसभूषण, ऊससंदेश असे विविध पुरस्कार देण्यात येतात. तसेच विस्तार कार्यात मौलिक कामगिरी करणाऱ्या राज्यातील निवडक कृषी पत्रकारांनाही पुरस्कार दिले जातात. यंदा ज्ञानेश्वर मोंढे (अडसरेखुर्द, जि. नाशिक), धनाजी कदम (कुंदलवाडी, जि. सांगली), संतोष पाटील (बोरगाव, जि. सांगली), बाळासो सलगर (बोरगाव, जि. सांगली), तुषार सलगर (बोरगाव, जि. सांगली), रोहन पाटील (वसगड, जि. कोल्हापूर), तुषार शितोळे (रोपळे, जि. सोलापूर),
सागर पाटील (नांदगाव, जि. कोल्हापूर), बाळासाहेब पडवळ (सविंदणे, जि. पुणे), कल्याण जाधव (साप, जि. सातारा), राजेंद्र कोळेकर (बेंबळे, जि. सोलापूर), संजय जगताप (पणदरे, जि.पुणे), विजय कोकरे (कुगाव,जि. सोलापूर) यांना ऊसभूषण, युवराज माने (कोपार्ड, जि. कोल्हापूर), मेघनाथ देशमुख (पाटकूल, जि. सोलापूर), प्रशांत चंदोबा (दानोळी, जि. कोल्हापूर), श्रीकृष्ण शिंदे (सुगाव, जि. लातूर),
नितीन वसेकर (पाटकूल, जि. सोलापूर), प्रवीण माळी (शिरोळ, जि. कोल्हापूर) यांना ऊसकार्य गौरव आणि कृषी पत्रकारांमध्ये ‘अॅग्रोवन’चे वरिष्ठ बातमीदार सुदर्शन सुतार (सोलापूर), एबीपी माझा, मुंबईचे गणेश लटके, अर्जुन नरदे (साखरडायरी, जयसिंगपूर), किरण जावळे (बीड), गौस तांबोळी (सोलापूर), योगेश नालंदे (बारामती, पुणे) या पत्रकारांना ऊससंदेश पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे, असेही माने पाटील यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.