Seed Production Agrowon
ॲग्रो विशेष

Seed Production : ग्रामबीजोत्पादन कार्यक्रम राज्यभर घेतला जाणार

Gram Bijotpadan : येत्या खरिपात शेतकऱ्यांकडील गुणवत्तापूर्ण बियाणे गावपातळीवर उपलब्ध होण्यासाठी ग्रामबीजोत्पादन कार्यक्रम राज्यभर हाती येण्यात येणार आहे.

मनोज कापडे

Pune News : येत्या खरिपात शेतकऱ्यांकडील गुणवत्तापूर्ण बियाणे गावपातळीवर उपलब्ध होण्यासाठी ग्रामबीजोत्पादन कार्यक्रम राज्यभर हाती येण्यात येणार आहे. ग्रामबीजोत्पादनाच्या संकल्पनेमुळे बियाण्यांचा तुटवडा न होण्यास मदत होते.

नैसर्गिक आपत्ती किंवा बियाणे टंचाईची स्थिती असल्यास खासगी बियाणे कंपन्यांचे बियाणे शेतकऱ्यांना वेळेत व पुरेसे उपलब्ध होत नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर गुणवत्तापूर्ण बियाणे मिळण्यासाठी ग्रामबीजोत्पादन हा प्रभावी उपाय असल्याचे कृषी खात्याला वाटते.

त्यामुळेच येत्या खरिपात राबविल्या जाणाऱ्या ग्रामबीजोत्पादन कार्यक्रमात गुणवत्तापूर्ण व प्रमाणित बियाण्यांची उपलब्धता वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले आहे. नवीन वाणांचा वापर वाढविणे तसेच बियाणे बदल दरामध्ये वाढ करण्याचा प्रयत्नदेखील या कार्यक्रमाद्वारे केला जाणार आहे.

कृषी आयुक्तालयाच्या म्हणण्यानुसार, ग्रामबीजोत्पादन कार्यक्रमाची व्याप्ती काही विशिष्ट जिल्ह्यांपुरती न ठेवता राज्यभर ठेवण्याचा प्रयत्न राहील. कार्यक्रमात सहभागी झालेल्या शेतकऱ्याला महाबीजमार्फत एक एकर क्षेत्र मर्यादेपर्यंत बियाणे दिले जाणार आहे.

यात कडधान्य व गळीतधान्य बीजोत्पादनासाठी कमाल ६० टक्के तर तृणधान्य बीजोत्पादनासाठी कमाल ५० टक्के अनुदानित किमतीने बियाण्यांचा पुरवठा केला जाणार आहे.

संकल्पना चांगली पण निधी कमी

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ग्रामबीजोत्पादन ही संकल्पना चांगली असली तरी अंमलबजावणी ढिसाळ होते. २०२३-२४ मध्ये या कार्यक्रमासाठी ४८ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला होता. परंतु, त्यासाठी केवळ ३५.७५ कोटी रुपयांचा निधी मिळाला. यात केंद्राचा निधी हिस्सा २१.४५ कोटी रुपयांचा तर राज्याचा हिस्सा १४.३६ कोटींचा होता.

सव्वा दोन लाख शेतकरी गेल्या हंगामात सहभागी

राज्याच्या ग्रामबीजोत्पादनात कार्यक्रमात गेल्या खरिपात २.१५ लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. यात १. ८५ लाख गहू उत्पादक शेतकरी, तर ३० हजार हरभरा उत्पादक सहभागी झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT