Harshvardhan Sapkal Agrowon
ॲग्रो विशेष

Resignation Demand of Agriculture Minister: राज्यपालांनी कृषिमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्यावा: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

Congress State President Harshvardhan Sapkal: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतरही सरकारने त्यांचा राजीनामा घेतला नाही, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. त्यांनी राज्यपालांनी याप्रकरणी हस्तक्षेप करून कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा आणि आमदारकी रद्द करावी, अशी मागणी केली आहे.

Team Agrowon

Mumbai News: ‘‘कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर त्यांचा तातडीने राजीनामा घेऊन आमदारकी रद्द करायला हवी होती. मात्र सरकार सत्ताधाऱ्यांना एक आणि विरोधकांना दुसरा न्याय लावत आहेत.

राज्यपालांनी तातडीने याप्रकरणी हस्तक्षेप करून कोकाटे यांचा राजीनामा घेऊन आमदारकी रद्द करायला हवी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी (ता. २१) केली. महाराष्ट्र एसटी कामगार काँग्रेसने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला श्री. सपकाळ यांनी भेट दिली. या वेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, की फसवणूक प्रकरणी न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतर त्यांनी तत्काळ राजीनामा द्यायला हवा होता. किंबहुना, सरकारने त्यांचा राजीनामा घ्यायला हवा होता पण तसे झाले नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर मानहानीच्या एका बोगस प्रकरणात न्यायालयाने शिक्षा ठोठावली असता सचिवालयाने अर्ध्यारात्रीच त्यांची खासदारकी रद्द केली.

त्यानंतर त्यांचे शासकीय घरही सोडण्यास भाग पाडले. काँग्रेसचे नेते व माजी मंत्री सुनील केदार यांना न्यायालयाने शिक्षा ठोठावताच त्यांची आमदारकी तत्काळ रद्द केली. मात्र कोकाटे प्रकरणात सरकार लोकशाही पद्धतीने वागत नाही, हे स्पष्ट होत आहे.

‘एसटीला राज्य सरकारने मदत करावी’

एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे, ग्रामीण भागात एसटी सेवेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे, ही सेवा चालू राहिली पाहिजे. एसटीमध्ये ज्या सवलती दिल्या जातात त्याचा पैसा राज्य सरकारने एसटी महामंडळाला दिला पाहिजे.

एसटी कामगारांच्या वतीने रक्तदानासारखे महत्त्वाचे कार्य वर्षानुवर्षे सुरू आहे हे कौतुकास्पद आहे, असेही सपकाळ म्हणाले. महाराष्ट्र एसटी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला राज्यभरातून आलेले एसटी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

Turmeric Harvest Management: हळद काढणी पश्चात व्यवस्थापनावर मार्गदर्शन

Farmer Compensation Maharashtra : राज्यात २ लाख ४ हजार हेक्टर शेतीपिकांचं नुकसान; शेतकऱ्यांना लवकरात-लवकर मदत देणार, कृषिमंत्री भरणे यांची ग्वाही

Fertilizer Stock Approved: अकोला जिल्ह्यासाठी १.१४ लाख टन खत मंजूर

SCROLL FOR NEXT