Ahilyanagar News : ‘‘समृद्ध शेती आणि संपन्न शेतकरी’ हे उद्दिष्ट समोर ठेवून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांमधून शेतकऱ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने स्मारक, नेवासा येथे संत ज्ञानेश्वर महाराज सृष्टी प्रकल्प, पर्यटन विकास, शैक्षणिक संस्थांना एकत्रित करत रोजगारनिर्मिती यासह विकास आराखड्याच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाचे प्रयत्न करण्यात येत आहेत,’’ असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
अहिल्यानगर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री विखे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजवंदन झाले. त्या वेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष येरेकर, उपवनसंरक्षक धर्मवीर साळविठ्ठल या वेळी उपस्थित होते.
विखे पाटील म्हणाले, ‘‘जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासातून राज्यातील अग्रगण्य जिल्हा म्हणून अहिल्यानगरची ओळख निर्माण करू. शेती हा सामाजिक मुख्य गाभा आहे. शेती आणि शेतकरी विकासासाठी सरकार अनेक योजना राबवत असून त्यातून शेतकऱ्यांना सक्षम केले जात आहे. शेती समृद्ध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.’’
या वेळी झालेल्या संचलनात पोलिस दलाचे पुरुष आणि महिला पोलिस, गृहरक्षक दल, वाहतूक पोलिस, बँड पथक, श्वान पथक, वज्रवाहन, सायबर सेल जनजागृती वाहन, क्षयरोग दुरीकरण वाहन, बालविवाहास प्रतिबंध जनजागृती वाहन तसेच न्यू आर्ट्स अँड कॉमर्स, सायन्स महाविद्यालय, त्रिमूर्ती पब्लिक स्कूल, नेवासा, आठरे पब्लिक स्कूल, वर्का हायस्कूल, कारमेल कॉन्व्हेंट स्कूल, दिवटेपाटील पब्लिक स्कूल, स्नेहालय स्कूल, मेहेर इंग्लिश स्कूल या शाळांच्या मुले व मुलींच्या पथकांनी सहभाग घेतला.
यशस्वीतांचा गौरव
अहिल्यानगर येथे झालेल्या कार्यक्रमात शहीद नायक एकनाथ कर्डिले यांना पंतप्रधान श्रीमती शेख हसिना गण प्रजातंत्रात्मक बांगलादेश सरकारद्वारे मिळालेले सन्मानपत्र वीरपत्नी कौशल्याबाई कर्डिले यांना प्रदान करण्यात आले.
त्याबरोबरच राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झालेले स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र देवमन, पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, सहायक फौजदार रवींद्र पांडे, पोलिस हवालदार सुरेश माळी, विश्वास बेरड, पोलिस कॉन्स्टेबल फुरकान अब्दुल मुजीब शेख, प्रशांत राठोड यांचा सन्मान करण्यात आला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.