Tribal Development Schemes Agrowon
ॲग्रो विशेष

Tribal Development : आदिवासींच्या विकासावर शासनाचा भर : मंत्री महाजन

Government Scheme for Development : दुर्गम आदिवासी भागातील लोकांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचवून त्यांच्या विकासावर भर देत आहोत.

Team Agrowon

Nanded News : दुर्गम आदिवासी भागातील लोकांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचवून त्यांच्या विकासावर भर देत आहोत. प्रत्येक व्यक्तींच्या गरजेनुसार ज्या योजना त्यांना योग्य असतील अशा योजना साकारलेल्या आहेत.

यात शिक्षणापासून ते आरोग्यापर्यंत, स्वयंरोजगारापासून कृषीपर्यंत विविध योजनांचा समावेश आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले. विकसित भारत संकल्प यात्रेच्या किनवट येथील शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी आमदार भीमराव केराम, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, गोकुंदा येथील सरपंच अनुसया सिडाम,

सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी एस. कार्तिकेयन, शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम, सुधाकर भोयर आदी उपस्थित होते.

स्वातंत्र्याच्या लढ्यात आदिवासी समाजानेही मोठे योगदान दिले आहे. भगवान बिरसा मुंडा, तंट्ट्या भिल्ल, तेलंगा खडीया, वीर नारायण सिंह, जत्रा भगत, अल्लूरी राजू, या क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यासाठी आपले योगदान दिले आहे.

जल, जमीन, जंगल यांच्या रक्षणासाठी आदिवासी बांधवांनी मोठी भूमिका पार पाडली आहे. आदिवासींच्या विकासासाठी विविध विकास योजना प्रभावीपणे पोहोचविण्याची गरज आहे. या यात्रेतून दुर्गम भागातील प्रत्येक गावात ज्या आदिवासींना आजवर कोणत्या योजना मिळाल्या नाहीत अशा लाभार्थ्यांची निवड करून त्यांना त्या त्या योजनांचा लाभ देण्याच्या कामास निश्‍चित गती मिळेल, असा विश्‍वास पालकमंत्री महाजन यांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT