Mumbai News : भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड) आणि भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघ (एनसीसीएफ) मार्फत करण्यात येणारी सोयाबीन खरेदी बारदाना अभावी रखडू नये, यासाठी तातडीने पावले उचला, असे निर्देश पणनमंत्री जयकुमार रावल यांनी मंगळवारी (ता. ३१) उशिरा झालेल्या आढावा बैठकीत दिले दिले.
सह्याद्री अतिथिगृह येथे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन व महाराष्ट्र कापूस उत्पादक पणन महासंघाच्या बैठकीत आढावा घेतला.बाजारपेठेमध्ये सोयाबीनला दर नसल्यामुळे नाफेड करून खरेदी करण्यात येणाऱ्या केंद्रांवर शेतकरी सोयाबीन विक्री करण्यास तयार आहेत, मात्र वखार महामंडळाकडे बारदाना नसल्याने सोयाबीन खरेदी रखडली आहे.
या बाबत ‘ॲग्रोवन’मधून वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर आढावा बैठकीत मंत्री रावल यांनी वखार महामंडळाला सक्त सूचना केल्या. बारदानाअभावी सोयाबीन खरेदी रखडू नये. तशा तक्रारी येता कामा नयेत, असेही ते म्हणाले.वखार महामंडळ साठवणूक केलेल्या शेतीमालाचा विमा उतरवून शेतकऱ्यांना साठवणूक भाड्यामध्ये सवलत देते. ही सुविधा शेतकऱ्यांच्या लाभाची आहे. त्यामुळे शेतकरी हिताच्या सुविधा देणाऱ्या वखार महामंडळाने गोदामांचा विस्तार करून साठवणूक
क्षमतेत वाढ करा, असे निर्देशही रावल यांनी दिले. सध्या अस्तित्वात असलेल्या वखार महामंडळाच्या गोदामांच्या दुरुस्तीचा कार्यक्रम राज्यभर राबविण्यात यावा. ज्या ठिकाणी गोदामांमध्ये शीतगृहाची सुविधा उपलब्ध करून देणे शक्य आहे, तिथे देण्यात यावी. राज्यात होत असलेल्या ड्राय पोर्टमध्ये प्राधान्याने गोदामांची निर्मिती करावी. शेतीमालाच्या उत्पादकतेनुसार विशिष्ट शेतीमाल साठवण्यासाठी ‘सायलो’ निर्मितीवर भर देण्यात यावा. रेल्वे मार्गाजवळ मालवाहतुकीच्या दृष्टिकोनातून गोदामांची निर्मिती करावी, अशाही सूचना रावल यांनी दिल्या.
मंत्री रावल यांच्या सूचना
महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या गोदामांची क्षमतेनुसार व परिस्थितीनुसार श्रेणीबद्धता करावी.
सद्यःस्थितीत उपयोगात असणारे, निर्लेखित करण्यात येणारे यांची श्रेणी करावी.
सोयाबीन खरेदीमध्ये फेडरेशनने आपला सहभाग वाढवावा.
बारदाण्याअभावी कुठल्याही परिस्थितीत खरेदी रखडू नये, याची काळजी घ्यावी.
बारदाना उपलब्धतेसाठी प्रयत्न करा.
भारतीय कापूस महामंडळाकडील रक्कम येण्यासाठी पाठपुरावा करण्यात यावा. राज्यात मागणीनुसार व कापूस उत्पादनाच्या अंदाजानुसार ‘सीसीआय’कडे कापूस खरेदी केंद्रे सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे गरज आहे. महाराष्ट्र कापूस उत्पादक पणन महासंघाच्या काही अडचणी असतील तर त्या दूर केल्या जातील.जयकुमार रावल, पणनमंत्री
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.