Soybean Variety : सोयाबीन वाणांनी वाढविला विद्यापीठाचा लौकिक

Soybean Research : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सोयाबीन संशोधन केंद्राद्वारे विकसित सरस वाणांचा देशभरात प्रसार झाला आहे.
Soybean Variety : सोयाबीन वाणांनी वाढविला विद्यापीठाचा लौकिक
Published on
Updated on

Vasantrao Naik Agricultural University : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सोयाबीन संशोधन केंद्राद्वारे विकसित सरस वाणांचा देशभरात प्रसार झाला आहे. आजवरच्या वाटचालीत या केंद्राने सोयाबीनचे बदलत्या हवामान स्थितीस अनुकूल, कीड-रोग प्रतिकारक, उत्पादनाच्या बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण असे १७ वाण विकसित केले आहेत.

दर्जेदार वाण संशोधनात देश पातळीवर मध्य प्रदेशातील जबलपूर येथील सोयाबीन संशोधन केंद्रानंतर परभणी येथील सोयाबीन संशोधन केंद्राचा क्रमांक आहे. या संशोधन केंद्राच्या तांत्रिक शिफारशी स्वीकारून शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या उत्पादकतेत वाढ केली. या वाणांनी शेतकऱ्यांच्या अर्थकारणात बदल घडविला आहे.

Soybean Variety : सोयाबीन वाणांनी वाढविला विद्यापीठाचा लौकिक
Soybean MSP Procurement: हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी नोंदणीला ६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ; खरेदीची मुदत जैसे थे

गेल्या काही वर्षांत खरीप हंगामातील कपाशी या नगदी पिकाला मागे सारत सोयाबीन हेच मुख्य पीक झाले आहे. पिवळे सोने म्हणून ओळख असलेल्या या तेलवर्गीय पिकांवर राज्यातील मराठवाडा, विदर्भासह राज्याच्या बहुतांश भागातील शेतकऱ्यांचे अर्थकारण आधारले आहे. कृषी विद्यापीठामध्ये १९७५ मध्ये भारतीय कृषी संशोधन परिषदेतर्फे (आयसीएआर) अखिल भारतीय समन्वित सोयाबीन संशोधन प्रकल्प स्थापन करण्यात आला. राज्यातील हा पहिला संशोधन प्रकल्प आहे. या केंद्राचा भारतातील प्रमुख सोयाबीन संशोधन केंद्रात समावेश आहे.

सोयाबीनचे १७ वाण संशोधित....

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सोयाबीन संशोधन केंद्राने सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. या केंद्राने १९९५ ते २०२३ याकालावधीत १३ वाण प्रसारित केले आहेत, तर ४ वाण प्रसारणाच्या मार्गावर आहेत. १९९५ मध्ये एमएयूएस १ (आरती),एमएयूएस २ (पुजा), १९९८ मध्ये एमएयूएस ४७ (परभणी सोना),२००० मध्ये एमएयूएस ३२ (प्रसाद), २००१ मध्ये एमएयूएस ६१ (प्रतिकार),

एमएयूएस ६१-२ (प्रतिष्ठा),२००२ मध्ये एमएयूएस ७१ (समृद्धी), २००३ मध्ये एमएयूएस ८१ (शक्ती), २००९ मध्ये एमएयूएस १५८, २०१४ मध्ये एमएयूएस १६२ आणि २०१८ मध्ये एमएयूएस ६१२,२०२२ मध्ये एमएयूएस ७२५, २०२३ मध्ये एमएयूएस ७३१ हे वाण प्रसारित झाले आहेत. एमएयूएस ७३२,एमएयूएस ७९१, एमएयूएस ७९३, एमएयूएस ७९५ हे ४ नवीन वाण आहेत.

Soybean Variety : सोयाबीन वाणांनी वाढविला विद्यापीठाचा लौकिक
Soybean Procurement : बारदाना नसल्याने सोयाबीन खरेदीत खोळंबा; शेतकऱ्यांमध्ये नाराजी

पैदासकारांचे योगदान...

या केंद्राचे आजवरचे प्रभारी अधिकारी तथा पैदासकार डॉ. ए. आर. सिंग, प्रो. एस. एम. सुदेवाड, डॉ. पी. आर. खापरे, डॉ. आय. एस. माद्रप, डॉ. खिजर बेग, डॉ. एस. पी. मेहत्रे यांचे वाण विकसित करण्यात महत्त्वपूर्ण योगदान आहे. डॉ. बेग यांनी एमएयूएस १५८, एमएयूएस १६२, एमएयूस ६१२ हे वाण स्वतंत्ररीत्या विकसित केले आहेत. तर एमएयूस ७२५ हा वाण डॉ. म्हेत्रे यांच्या समवेत विकिसित केला आहे. कुलगुरू डॉ. इंद्र मणी, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या मार्गदर्शनात संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी तथा पैदासकार डॉ. सुनील उमाटे कीटकशास्त्रज्ञ डॉ. आर. एस. जाधव, सहायक पैदासकार आर. एस. घुगे हे शास्त्रज्ञ कार्यरत आहेत.

सोयाबीनच्या पैदासकार (ब्रीडर सीड) बियाण्याच्या कृषी मंत्रालयाकडून देण्यात येणाऱ्या आवंटनामध्ये परभणी कृषी विद्यापीठाचे सोयाबीनचे वाण पहिल्या पाच मध्ये आहेत. सोयाबीन वाणांच्या पैदासकार बियाण्याचा पुरवठा महाबीज तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांना केला जातो. मागणी वाढल्याने बियाणे उत्पादन वाढ करण्यात आली आहे.
डॉ. खिजर बेग, पैदासकार तथा संशोधन संचालक, वनामकृवि, परभणी. ७३०४१२७८१०
आम्ही शेतकरी संघामार्फेत उस्मानाबाद जिल्ह्यात सोयाबीनचे सुमारे तीन हजार एकरवर बीजोत्पादन घेत असतो. त्यात विद्यापीठाच्या एमएयुएस १५८, एमयूएस ७१, एमएयूएस १६२, एमएयूएस ६१२, एमएयूएस ७२५ वाण सरस या दोन वाणांचा ८०० एकर बीजोत्पादन पावसाच्या खंड काळात चांगले उत्पादन मिळेत. कीड-रोग प्रतिकार आहेत. सोयाबीनमध्ये रुंद वरंबा सरी तंत्रज्ञान अनेक बाबतीत फायदेशीर आहे.
ॲड. अमोल रणदिवे, सीताई सीड्‍स ओडीएसएफ ॲग्रो प्रोड्यूर्स कंपनी लि., धाराशिव. ९८८१३०३१२८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com