Co-Operative Society  Agrowon
ॲग्रो विशेष

Co-Operative Society : सेवा सोसायट्यांना जागा देण्याचा प्रयत्न करू

Co-Operative Institute : सेवा सहकारी संस्था संगणकीकृत व्हाव्यात यासाठी केंद्र शासनाकडून संगणक यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Team Agrowon

Akola News : सहकार चळवळीत खेडोपाडी महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या सेवा सहकारी सोसायट्यांच्या कार्यालयांसाठी जागा मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर आपण निश्चित प्रयत्न करू, असे आश्‍वासन सहकार, शालेय शिक्षण व गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.

दि. अकोला-वाशीम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त ‘सहकारातून समृद्धी’ उपक्रमाचा प्रारंभ राज्यमंत्री श्री. भोयर यांच्या हस्ते झाला. या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार रणधीर सावरकर, आमदार किरण सरनाईक, बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोषकुमार कोरपे, माजी मंत्री सुभाष ठाकरे, सुभाष कोरपे यांच्यासह सहकारातील नेते, अधिकारी उपस्थित होते.

श्री. भोयर म्हणाले, सेवा सहकारी संस्था संगणकीकृत व्हाव्यात यासाठी केंद्र शासनाकडून संगणक यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थांच्या कार्यालयांसाठी जागा उपलब्ध करून द्यावी म्हणून मागणी होत आहे. त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल. चांगल्या उपक्रमांसाठी शासनाचे सदैव सहकार्य राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

आमदार सावरकर, आमदार सरनाईक, माजी मंत्री ठाकरे यांचीही भाषणे झाली. बँकेचे अध्यक्ष कोरपे यांनी बँकेची वाटचाल, उपक्रमांबाबत सविस्तर माहिती दिली. शासनाकडून अपेक्षा व्यक्त केल्या. या वेळी जिल्ह्यातील घुंगशी येथील सेवा सहकारी सोसायटीला १०७ वर्षे पूर्ण झाल्याबाबत संचालकांचा सत्कार करण्यात आला.

बँक प्रशासनाचे कौतुक

आपल्या भाषणात राज्यमंत्री भोयर यांनी जिल्हा बँकेच्या व्यवस्थापनाचे कौतुक केले. विदर्भात चांगल्या प्रकारे सहकाराचे काम या ठिकाणी बघायला मिळते. एकीकडे वर्धा जिल्हा बँकेचा एनपीए ९५ टक्के एवढा आहे तर दुसरीकडे त्याच विदर्भात अकोला-वाशीम मध्यवर्ती बँक नफ्यात काम करीत आहे.

बँकेचे नेतृत्व, व्यवस्थापन चोख असल्याने हे शक्य असल्याचे गौरवोद्गारही भोयर यांनी काढले. काळाची पाऊले ओळखत बँक व्यवस्थापनाने कारभार चालवल्याने हे शक्य झाले आहे. हा आदर्श इतरांनी घेतला पाहिजे असेही ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT