Electricity Bill Recovery Agrowon
ॲग्रो विशेष

Electricity Bill Dues : शासकीय ग्राहकांकडे महावितरणची ११६ कोटींची थकबाकी

Mahavitaran : महावितरणने वीजबिल थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतलेली आहे. बिल न भरल्यास २४ मार्चनंतर या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : शासकीय ग्राहकांकडे महावितरणची ११६ कोटींची थकबाकी झाली आहे. छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील शासकीय ग्राहकांनाही वीजबिल भरण्यासाठी नोटिसा देण्यात आलेल्या आहेत.

महावितरणने वीजबिल थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतलेली आहे. बिल न भरल्यास २४ मार्चनंतर या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे. छत्रपती संभाजीनगर परिमंडलांतर्गत विविध शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था अशा ५ हजार २२२ ग्राहकांकडे ११६ कोटी २५ लाख रुपयांची थकबाकी आहे.

यात छत्रपती संभाजीनगर शहर मंडलातील १०५८ ग्राहकांकडे ११ कोटी ५३ लाख, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडलातील ३ हजार १८६ ग्राहकांकडे ९२ कोटी ४६ लाख तर जालना मंडलातील ९७८ ग्राहकांकडे १२ कोटी २६ लाख रुपयांची थकबाकी आहे.

या सर्व ग्राहकांना महावितरणच्यावतीने वीजबिल थकबाकी भरण्याबाबत नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. २४ मार्चपर्यंत जे ग्राहक वीजबिल भरणार नाहीत, त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा महावितरणच्या वतीने देण्यात आला आहे.

दरम्यान, महावितरणने सर्वच वर्गवारीतील वीजग्राहकांकडे असलेल्या वीजबिल वसुलीसाठी धडक मोहीम छत्रपती संभाजीनगर परिमंडळात सुरू केलेली आहे. अभियंते व तंत्रज्ञांसोबतच कार्यालयीन अधिकारी, कर्मचारीही वीजबिल वसुली मोहिमेत सहभागी झाले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT