Chandrakant Patil  Agrowon
ॲग्रो विशेष

Silk Industry : रेशीम उद्योगास चालना देण्यासाठी शासन कटिबद्ध

Chandrakant Patil : रेशीम शेतीकडे राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत आहेत. राज्य शासन ही रेशीम उद्योगास चालना देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी (ता. १९) केले.

Team Agrowon

Solapur News : कृषी क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान येत असून, शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांऐवजी कमी संसाधनात जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या नवीन पिकांचे प्रयोग शेतात राबवले गेले पाहिजेत. तुती लागवड किंवा रेशीम उत्पादन हा एक चांगला पर्याय शेतकऱ्यांसमोर आलेला असून, रेशीम शेतीकडे राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत आहेत. राज्य शासन ही रेशीम उद्योगास चालना देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी (ता. १९) केले.

हिरज (ता. उत्तर सोलापूर) रेशीम कोष बाजारपेठ आणि रेशीम पार्क इमारतीचे उद्‌घाटन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी आयोजित रेशीम शेतकरी कार्यशाळेमध्ये ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, आमदार सुभाष देशमुख, उपसचिव श्रद्धा कोचरेकर, कुलगुरू प्रकाश महानवर, प्रादेशिक सहायक संचालक कविता देशपांडे, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक शीतल चव्हाण,

रेशीम विभागाचे उपसंचालक महेंद्र ढवळे, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, रेशीम विकास अधिकारी विनीत पवार, एम. ए. कट्टे, राम जाधव उपस्थित होते. आमदार सुभाष देशमुख यांनी या वेळी रेशीम बाजारपेठ कार्यान्वित केली असून, आता उत्पादन वाढीकडे लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली. उपसंचालक श्री. ढवळे यांनीही मनोगत व्यक्त केले. या वेळी रेशीम उद्योग पुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. रेशीम विकास अधिकारी विनीत पवार यांनी प्रास्ताविक केले.

वार्षिक योजनेतून रेशीम शेतीला साह्य

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, की जिल्ह्यातील वातावरण डाळिंब व रेशीम उत्पादनासाठी फायदेशीर आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या आहेत. रेशीम अनुदानाचे प्रलंबित प्रस्ताव लवकर मार्गी लागण्यासाठी प्रयत्न करत आहोत. जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून रेशीम उद्योगास चालना मिळण्यासाठी मदत करणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmers: आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त अकोल्यात महिला शेतकऱ्यांसाठी विशेष उपक्रम

Soybean Fodder Seized: कारंजा तालुक्यात २६० टन सोयाबीन कुटार जप्त; १० कारखान्यांना नोटिसा

Orange Orchards Crisis: पाण्याअभावी संत्रा बागा संकटात; वाशीममधील शेतकऱ्यांची चिंता वाढली

Mango Variety Research: नवसारी कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर महाराष्ट्रातील शिष्टमंडळाकडून पाहणी

Agricultural Labour Protest: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ५ नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत पिठलं-भाकरी आंदोलन

SCROLL FOR NEXT