Gopinath Munde Farmer Accident Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Accident Insurance : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात अनुदान २० शेतकऱ्यांना मजूर

Agriculture Scheme : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेद्वारे दौंड तालुक्यातील अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या २० कुटुंबीयांना ४० लाखांची मदत मंजूर झाली आहे.

Team Agrowon

Pune News : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेद्वारे दौंड तालुक्यातील अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या २० कुटुंबीयांना ४० लाखांची मदत मंजूर झाली आहे. त्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाखांच्या धनादेशाचे वाटप आमदार राहुल कुल यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

दौंड तालुक्यातील अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेद्वारे आर्थिक मदत मिळावी यासाठी आमदार राहुल कुल यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा केला होता. त्याद्वारे दौंड तालुक्यातील अपघाती मृत्यू झालेल्या २० शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख रुपयांच्या मदतीच्या धनादेशांचे वाटप करण्यात आले.

यामध्ये ऑक्टोबर २०२२ मध्ये रावणगाव येथे ट्रॅक्टर ट्रॉली कालव्यात पडल्याने दुर्दैवी मृत्यू झालेल्या ३ मजूर भगिनींच्या कुटुंबीयांचा देखील यात समावेश आहे. या वेळी तालुका कृषी अधिकारी राहुल माने, भाजप तालुकाध्यक्ष हरिभाऊ ठोंबरे, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष अरुण आटोळे, भाजप नेते तानाजी दिवेकर, भीमा पाटसचे संचालक विकास शेलार आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेद्वारे खालील मयत शेतकऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे-

रेश्मा भागूजी पानसरे (रावणगाव), सुरेखा बाबासो पानसरे ( रावणगाव), अश्विनी प्रमोद आटोळे (रावणगाव), मारुती गुलाब दिवेकर (पारगाव), विलास अर्जुन माने (हिंगणी बेर्डी), चंद्रकांत बबन रांधवन (रावणगाव), दिनकर गांडले (पारगाव), सचिन भीमराव ताम्हाणे (ताम्हणवाडी), संकेत सदाशिव म्हेत्रे (बोरीऐंदी),

विष्णू मुरलीधर पाचपुते (बोरीबेल), स्वप्नील बाळासाहेब दरेकर (बोरीऐंदी), शंकर काशिनाथ काळे (मलठण), मनोहर विठ्ठल दिवेकर (पाटस), संजय नरहरी शिंदे ( हातवळण), प्रफुल्ल अर्जुन शितोळे (कुसेगाव), अरविंद मुगुटराव भगत (वासुंदे), पोपट भागूजी मरगळे (मेरगळवाडी), सुदाम मुगुटराव शेळके (केडगाव), संपत कोंडिबा चौधरी (खोर).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT