Gold Market Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Gold Market Rate : विजयादशमीला जळगावात ‘सुवर्ण लूट’

Jalgaon God Market : सोन्याचे महाराष्ट्रीयन, पेशवाई, इटालियन आदी प्रकारचे दागिने, सोन्याच्या चिप्सला मोठी मागणी होती. विजयादशमीला सोने खरेदी केल्यास ते मोडण्याची वेळ येत नाही.

Team Agrowon

Jalgaon News : साडेतीन मुहूर्तापेकी एक विजयादशमीच्या पार्श्‍वभूमीवर सोन्यासह दुचाकी, चारचाकी वाहने, ट्रॅक्टर, कृषी अवजारे, कपडे आदींची मोठी विक्री झाली. ग्रामीण भागातील ग्राहकांचाही बरा प्रतिसाद मिळाला. कोट्यवधींची उलाढाल यातून झाल्याची माहिती बाजारपेठेतील सूत्रांनी दिली.

सोन्याचे महाराष्ट्रीयन, पेशवाई, इटालियन आदी प्रकारचे दागिने, सोन्याच्या चिप्सला मोठी मागणी होती. विजयादशमीला सोने खरेदी केल्यास ते मोडण्याची वेळ येत नाही. ते चिरकाल टिकते अशी श्रद्धा अनेकांची आहे.

यामुळे अनेकांनी कुटुंबीयांसोबत सोन्याचे दागिने घेण्यासाठी शहरातील नवलखा ज्वेलर्स, रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स, भंगाळे गोल्ड या सोन्याच्या शो-रूमध्ये खरेदीसाठी सकाळपासूनच गर्दी केली होती. सोन्याच्या दरात काही दुकानांत शंभर- दोनशे रुपयांचा फरक होता. तरीदेखील विविध शोरूममध्ये दिवसभर ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी होती.

नवीन वाहनांसाठी गर्दी

विजया दशमीच्या मुहूर्तावर नवीन वाहन घरी नेण्यासाठी नागरिकांनी दुचाकी, चारचाकी वाहनाच्या शोरूमवर गर्दी केली होती. फोकस ह्युंडाई, सातपुडा मोबाइल, टीव्हीएस शोरूम आदी ठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहन घेण्यासाठी सकाळपासूनच अनेक कुटुंबीय दाखल झाले होते. नवीन गाडी घेतल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. सुमारे बाराशे दोन्ही प्रकारची वाहने विक्री झाल्याचे सांगण्यात आले.

दसरा अन्‌ सोने खरेदी असे नाते अनेक वर्षांपासून जोडले गेले आहे. विजयादशमीच्या मुहूर्तावर सकाळपासूनच ग्राहकांनी खरेदी सुरू केली. चांगला प्रतिसाद मिळाला. महिला वर्गाची विशेष दागिन्यांना पसंती होती.
- मनोहर पाटील, जनसंपर्क अधिकारी, रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स, जळगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT