Gokul Milk Agrowon
ॲग्रो विशेष

Gokul Dairy Milk: ‘गोकुळ’कडून गायीच्या दूध खरेदी दरात २ रुपयांची वाढ

Dairy Farmers Benefits: कोल्हापूर जिल्हा दूध संघ (‘गोकुळ’) ने १ एप्रिलपासून गायीच्या दूध खरेदी दरात २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री हसन मुश्रीफ यांनी ही घोषणा केली. आगामी काळात गोकुळ २५ लाख लिटर म्हशीच्या दुधाचे संकलन करण्याच्या उद्दिष्टावर भर देणार आहे.

Team Agrowon

Kolhapur News: कोल्हापूर जिल्हा दूध संघाने (गोकुळ) १ एप्रिलपासून गाय दूध खरेदी दरात दोन रुपयांनी वाढ करण्याच्या निर्णय घेतला आहे. याबाबतची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. आगामी काळात म्हशीचे २५ लाख लिटर दूध संकलन करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती त्यांनी दिली.

आमदार सतेज पाटील यांनीही १० गुंठे शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना म्हशींसाठी कर्जपुरवठा करणार असल्याचे या वेळी सांगितले. गुढीपाडव्यानिमित्त गोकुळ पेट्रोल पंप उद्‍घाटन, सायलेज बेलर व हार्वेस्टर मशिनरी प्रारंभ कार्यक्रमात मंत्री मुश्रीफ आणि आमदार पाटील बोलत होते.

गोकुळ दूध संघाच्या गाय दूध खरेदी तसेच म्हशीचे दूध संकलन वाढ आणि गोकुळच्या पुढील वाटचालीवर मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘‘कोल्हापूर जिल्हा दूध संघाकडून गाय दूध खरेदी दरात दोन रुपयांची वाढ १ एप्रिलपासून करण्यात येणार आहे. याचा दूध उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार असून दूध संकलन वाढवण्यावर भर द्यावा. तसेच म्हैस दूध संकलन २० लाख करण्याचा संकल्प होता तो १९ लाखांपर्यंत पोहोचला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील म्हशींच्या दुधाचा दर्जा चांगला आहे. त्यामुळे मुंबई, पुणे येथे दुधाची मागणी वाढत आहे. त्यासाठी येथे लवकरच दोन नवीन युनिट उभारावी लागणार आहेत.’’ ते म्हणाले, ‘‘२५ लाख लिटर संकलनाचे उद्दिष्ट गाठायचे असेल तर सभासदांनी म्हशींची संख्या वाढविली पाहिजे. गोकुळचे पाच लाख सभासद आहेत. त्यातील दोन लाख सभासदांनी प्रत्येकी एक म्हैस खरेदी केली तर आपण २५ लाखांचा टप्पा पूर्ण होऊ शकतो. यासाठी जिल्हा बँकेतून कर्ज देण्याची व्यवस्था केली जाईल.’’

या बाबत आमदार पाटील म्हणाले, ‘‘चार वर्षांत दूध खरेदी दरात अकरा रुपयांची वाढ केली आहे. गोकुळमध्ये सत्ता परिवर्तन झाल्यापासून दूध उत्पादक हिताचा कारभार करत आहे. गोकुळला मिळणाऱ्या एक रुपया उत्पन्नातील ८५.६८ पैसे परतावा दूध उत्पादकांना दिला जातो.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा सरी शक्य; उन्हाचा चटका कायम

Ratoon Sugarcane: खोडवा उसावरील एल निनोच्या उष्णतेचा ताण कसा कमी करावा?

Farmers Protest: शेतकरी अडचणीत, ऊस दर, धान खरेदी प्रश्नी राकेश टिकेत आक्रमक, मोठ्या आंदोलनाचा इशारा

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT