Goat Rearing Agrowon
ॲग्रो विशेष

Goat Rearing : पावसाळ्यात शेळ्यांना जपावे लागते...

Goat Farming : मोताळा (जि. बुलडाणा) येथील नळगंगा धरणाजवळ पुंडलिक पाटील यांचा नळगंगा गोट फार्म आहे. मागील सात वर्षांपासून ते शेळीपालन करीत आहेत.

 गोपाल हागे

Goat Rearing Farmer Management

शेतकरी नियोजन

पीक : डाळिंब

शेतकरी नियोजन : शेळीपालन

शेतकरी : पुंडलिक दयाराम पाटील

गाव : मोताळा, जि. बुलडाणा

शेळ्या : ९०

अनुभव : सात वर्षे

मोताळा (जि. बुलडाणा) येथील नळगंगा धरणाजवळ पुंडलिक पाटील यांचा नळगंगा गोट फार्म आहे. मागील सात वर्षांपासून ते शेळीपालन करीत आहेत. सध्या त्यांच्याकडे उस्मानाबादी, सिरोही जातीच्या एकूण ९० शेळ्या आहेत. शेतीपूरक म्हणून सुरू केलेल्या या व्यवसायामध्ये शेळ्यांचे संगोपन, खरेदी- विक्रीचे व्यवहार केले जातात.

सध्याचे व्यवस्थापन

पावसाळ्यामध्ये शेळ्यांमध्ये रोगांचे प्रमाण वाढते. हे लक्षात घेऊन पावसाळ्यापूर्वीच शेड व्यवस्थित करून घेतले. आतमध्ये ओलावा जास्त प्रमाणात राहू नये, यासाठी संपूर्ण शेडमध्ये आवश्यक तितका मुरूम टाकून घेतला आहे. सर्व शेळ्यांना जंतनाशकाची मात्रा दिली. शेळ्यांना et+tt आणि ppr या दोन प्रमुख आजारांचे लसीकरणही करून घेतले.

पावसाळ्यामध्ये हिरव्या चाऱ्याची उपलब्धता वाढत असली, तरी सुका चारा कमी पडतो. त्यामुळे शेळ्यांना वर्षभर पुरेल इतका सुका चारा व्यवस्थित गोदामामध्ये साठवून ठेवला.

नवीन खरेदी करून शेडमध्ये आणल्या जाणाऱ्या शेळ्यांसाठी वेगळे भाग केले आहेत. त्यामुळे या नव्याने आलेल्या शेळ्यांकडून गोठ्यातील अन्य शेळ्यांमध्ये रोगांचा प्रसार होत नाही.

विक्रीलायक बनलेल्या काही करडांची नियमित विक्री केली जाते. विक्रीच्या उद्देशाने उस्मानाबादी शेळ्या तयार केल्या आहेत. मागणीनुसार त्यांच्या विक्रीचे नियोजन आहे.

खरिपामध्ये शेळ्यांसाठी हिरव्या चाऱ्याची लागवड करून घेतली.

पावसाळ्याच्या कालावधीत शेळ्यांना होणाऱ्या विविध आजारांसाठी आधीच सर्व इंजेक्शन व औषधे उपलब्ध करून ठेवली आहे.

पुढील नियोजन

सर्व शेडमध्ये चुना टाकण्याचे नियोजन आहे. चुन्यामुळे शेड निर्जंतुक राहते. बाह्य परजीवींचा धोका कमी होण्यास मदत होते. शेळ्या निरोगी राहण्यास फायदा होतो.

पावसाळ्यात शेडमध्ये अधिक आर्द्रता व गारवा तयार होतो. तो कमी करण्यासाठी व शेळ्यांना ऊब मिळावी, या उद्देशाने शेडमध्ये पिवळे २०० वॉटचे बल्ब लावणार आहे.

पावसाळ्याच्या काळात शेळ्यांना बाहेर चरण्यास सोडण्यात अडचणी येतात. त्यामुळे शेडमध्येच त्यांच्या चाऱ्याचे नियोजन करावे लागते.

पावसाळ्यात शेळ्यांच्या खुराकामध्ये वाढ करणार आहे.

शेळ्यांना पावसाळ्यात होणाऱ्या विविध आजारांच्या दृष्टीने लक्षणांवर कटाक्षाने लक्ष ठेवावे लागते.

तयार झालेल्या शेळ्यांच्या खरेदी - विक्रीचे

नियोजन पाऊस व आजारांचा अंदाज घेऊन करणार आहे.

पुंडलिक दयाराम पाटील, ९८९०१२९६४५

(शब्दांकन : गोपाल हागे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT