Goat Market agrowon
ॲग्रो विशेष

Goat Market : बकरी ईद निमीत्त जनावरांचा बाजार फुलला, अठरा लाखांचा बोकडाची जोरदार चर्चा

Goat Market Kolhapur : व्यापारासाठी रत्नागिरी, आटपाडी, मिरज, जत-माडग्याळ, सातारा, रहिमतपूर, पलूस अशा विविध भागांतून खरेदी-विक्रीसाठी शेतकरी, व्यापारी आले होते.

sandeep Shirguppe

Eid Famous Goat : मुस्लिम धर्मियांचा सण सोमवारी (ता. १७) बकरी ईद असल्यामुळे कोल्हापुरातील वडगावमधील जनावरांच्या बाजारात मोठ्या प्रमाणात बोकड आणि शेळ्यांची मोठी आवक पहायला मिळाली. बाजारात अन्य जनावरांच्या तुलनेत बकऱ्यांचा मोठा बाजार भरला होता. या बाजारात बिटल, शिरुर, कवठेमहांकाळ, आटपाडी, कच्ची, अंडील अशा विविध जातींचे पालवे, बोकड विक्रीसाठी आले होते. याचा व्यापार करण्यासाठी व्यापारी, शेतकरी यांनी गर्दी केली होती.

व्यापारासाठी रत्नागिरी, आटपाडी, मिरज, जत-माडग्याळ, सातारा, रहिमतपूर, पलूस अशा विविध भागांतून खरेदी-विक्रीसाठी शेतकरी, व्यापारी आले होते. बाजाराच्या आवारात पूर्वेस हा बाजार भरतो. पहाटेपासून बाजार सुरू झाला. बकरी मोठ्या प्रमाणात येऊनही खरेदीदारांची संख्या कमी होती. त्यामुळे बकऱ्यांच्या किमती कमालीच्या कमी झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

वडगाव बाजार समितीमध्ये भरलेल्या बाजारात वेगवेगळ्या जातींच्या बकऱ्यांच्या खरेदीसाठी मोठी गर्दी झाली. या बाजारात अठरा लाख किमतीचा डोक्यावर चाँद असणारा वैशिष्ट्यपूर्ण देशी बोकड विक्रीसाठी आला होता. याला सात लाख किमतीस मागणी झाली; परंतु त्याचा व्यवहार झाला नाही. या बाजारात बकऱ्यांची आवक जास्त व खरेदीदारांची संख्या कमी असल्यामुळे बकऱ्यांचा दर ढासळला.

या बाजाराचे वैशिष्ट्य म्हणजे बाजारात सर्वाधिक किमतीचा बोकड विक्रीसाठी आला होता. नामदेव तुकाराम आवळेकर (रा. बोमनाळ, ता. अथणी, जि. बेळगाव) यांनी पालन केलेला बोकड लोकांचे खास आकर्षण ठरला. तीन वर्षे वयाचा बोकड असून जवळ जवळ पंच्याहत्तर किलो वजन आहे.

या बोकडाच्या कपाळावर चाँद असल्यामुळे त्याची किंमत अठरा लाख होती. त्याला एका व्यापाऱ्याने सात लाखास मागणी केली; परंतु व्यवहार झाला नाही. त्याची खास सोय असून वडगावच्या बाजारात विक्री न झाल्यास मिरज, कराड, मुंबईच्या बाजारात त्याला विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याचे सांगितले. मुंबईला त्याला चांगला दर मिळेल, अशी अशा आहे. त्याच्या मालकाने हलगीच्या तालावर त्याची बाजारातून मिरवणूक काढली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vidhan Parishad Election 2026: राज्यात पुन्हा निवडणुकीचा धुरळा, विधानपरिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक जाहीर

Solar Energy Project: अकोला परिमंडळातील ३३ हजार ३८० वीज ग्राहक बनले वीज निर्माते

School Education System: लाखो मुलांना शाळेबाहेर ढकलणारी व्यवस्था

Onion Rate : कांदा दरासाठी आमदार अंबादास दानवेंचं समृद्धी महामार्गावर आंदोलन; पोलिसांनी दानवेंना घेतलं ताब्यात

India Economic Crisis: आर्थिक आपत्तीचे इशारे आणि शांत मध्यमवर्ग

SCROLL FOR NEXT