Goa to Nagpur Bhaktimarga agrowon
ॲग्रो विशेष

Goa to Nagpur Bhaktimarga : गोवा ते नागपूर भक्तीमार्गाला कोल्हापुरातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

Bhaktimarg Kolhapur : गोव्याच्या पत्रादेवीपासून ते नागपुरातील महत्वाच्या तिर्थक्षेत्रापर्यंत असा ८०२ किमीचा भक्तीमार्गाचा प्रस्तावीत आराखडा जाहीर करण्यात आला आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Farmers : गोव्याच्या पत्रादेवीपासून ते नागपुरातील महत्वाच्या तिर्थक्षेत्रापर्यंत असा ८०२ किमीचा भक्तीमार्गाचा प्रस्तावीत आराखडा जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातून हा भक्तीमार्ग अनेक तालुक्यातून जाणार आहे. यातून जवळपास हजारो हेक्टर शेतकऱ्यांची जमीन हस्तातरीत होणार आहे. यावर कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील शेतकऱ्यांनी यास विरोध केला आहे.

नागपूर गोवा भक्तिमार्गाचे सर्वेक्षण कागल तालुक्यात सुरू झाले आहे. या मार्गाला विरोधाची ठिणगी एकोंडी व बामणी (ता. कागल) येथील शेतकऱ्यांच्या बैठकीतून पडली. यावेळी या महामार्गास विरोध करण्यासह मार्गामुळे बाधित होणाऱ्या अन्य गावांतील शेतकऱ्यांना एकत्रित करून संघटितपणे विरोध करण्याचा निर्धार केला या बैठकीत करण्यात आला.

मार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यामध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे हे शेतकरी एकमेकांकडे रस्त्याचाबत अधिक माहिती घेताना दिसत आहेत. या मार्गाचे काम सुरू झाले तर हजारो शेतकरी भूमिहीन होणार आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा मार्ग आम्ही होऊ देणार नाही. सरकारने पर्यायी मार्गाचा विचार करावा, अशी भूमिका शेतकऱ्यांनी बैठकीत मांडली.

त्यासाठी शासकीय पातळीवर मोर्चे, आंदोलने, निवेदने देण्याचा मार्ग अवलंबणार असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. महामार्गामुळे बाधित होणाऱ्या गावांमध्ये शेतकऱ्याच्या बैठका घेऊन जनजागृती करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे काळम्मावाडी धरणासाठी जमिनी गेल्यामुळे शेतकऱ्यांना येथे जमिनी दिल्या आहेत. आता या मार्गामुळे या शेतकऱ्यांवर दुसऱ्यांदा भूमिहीन होण्याची वेळ येणार आहे.

यावेळी कागल तालुक्यातील सुधीर पाटोळे, रंगराव सांडुगडे, शिवाजी मगदूम, दादासो पाटील, एम. पी. पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Fruit Drop: शुक्लकाष्ठ फळगळीचे!

Pimpalapur Farmer Death Assistance: पिंपळापूर येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची प्रशासनाकडून भेट; शासकीय योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT