Maize Agrowon
ॲग्रो विशेष

Maize Production: जागतिक पातळीवर विक्रमी मका उत्पादन?

Agriculture Commodity Market: यंदाच्या हंगामात (२०२५-२६) जागतिक पातळीवर विक्रमी मका उत्पादन होण्याची शक्यता आहे. अमेरिका, ब्राझील आणि भारतात उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे.

Anil Jadhao 

थोडक्यात माहिती...

१. २०२५-२६ मध्ये जागतिक मका उत्पादन १३०० कोटी टन होण्याचा अंदाज, ३.८% वाढ.

२. अमेरिका, ब्राझील व भारताकडून उत्पादन वाढीमुळे बाजारभावावर दबाव निर्माण.

३. मका दर ४.६० डॉलर्सवरून ४.२० डॉलर्स प्रति बुशेलपर्यंत खाली आल्याची शक्यता.

४. काही देशांमध्ये वापर वाढेल, पण जागतिक व्यापार २% घटेल.

५. साठा मर्यादित असून चीन-अमेरिका व्यापार धोरण बदलल्यास दर वाढू शकतात.

Pune News: यंदाच्या हंगामात (२०२५-२६) जागतिक पातळीवर विक्रमी मका उत्पादन होण्याची शक्यता आहे. अमेरिका, ब्राझील आणि भारतात उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुढील काही काळ मक्याच्या बाजारावर दबाव राहील. मात्र निर्यातदार देशांमधील कमी साठा आणि उत्पादनात घट आल्यास दराला आधार मिळेल. बदलत्या व्यापार धोरणामुळेही दरावर परिणाम होऊ शकतो, असा अंदाज जागतिक पातळीवरील विविध संस्थांनी व्यक्त केला.

अन्न आणि कृषी संघटनेची (एफएओ) अॅग्रिकल्चरल मार्केटींग इन्फर्मेशन सिस्टिम (एएमआयएस), बीएमआय रिसर्च, अमेरिकी कृषी विभाग (यूएसडीए) या संस्थांनी जागतिक मका उत्पादन, मागणी आणि किमतीविषयीचा अंदाज दिला आहे. बीएमआय रिसर्चने म्हटले आहे, की सीबाॅटवरील मका विक्रीच्या वाढत्या ओघामुळे दर कमी झाले आहेत. वायद्यांमध्ये मक्याची विक्री वाढली असून नवे करार कमी झाले आहेत.

एएमआयएसच्या अहवालात २०२५-२६ मध्ये १३०० कोटी टन मका उत्पादन होण्याचा अंदाज वर्तवला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादनात ३.८ टक्के वाढ अपेक्षित आहे. हा मका उत्पादनाचा नवा विक्रम असेल. अमेरिका, ब्राझील आणि भारतात मक्याचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. यूएसडीएने देखील भारतात मका उत्पादन वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे.

“जागतिक पातळीवर मका उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दरावरही दबाव राहील. मागील महिन्यातील अंदाजात २०२५ मध्ये मका दर ४.६० डाॅलर प्रति बुशेल्सलवर राहील असा अंदाज दिला होता. मात्र चालू महिन्यातील अंदाजात ४.४० डाॅलरपर्यंत दरपातळीचा अंदाज कमी करण्यात आला आहे”, असे बीएमआय रिसर्चने म्हटले आहे. यूएसडीच्या अंदाजानुसार मक्याचा सरासरी भाव ४.२० डाॅलर राहील.

चालू वर्षात दुसऱ्या तिमाहीत मक्याच्या भावात १२ टक्के घट दिसून आली. मक्याचा भाव ४.०६ डाॅलरपर्यंत कमी झाला. जागतिक पातळीवर यंदा उत्पादन वाढीचा अंदाज असल्याने बाजारावर दबाव राहण्याची शक्यता आहे. तरीही बाजाराचे लक्ष अमेरिकेतील मका उत्पादनाकडे आहे. तर दुसरीकडे युरोपमध्ये मका पुरवठ्याविषयी काहीशी चिंता आहे. यामुळे या भागात मका बाजाराला काहीसा आधार मिळू शकतो, असेही बीएमआयने म्हटले आहे.

मक्याचा वापरही वाढणार

एएमआयएसने आपल्या अंदाजात म्हटले आहे की, २०२५-२६ च्या हंगामात काही देशांमध्ये मक्याचा वापर वाढणार आहे. ब्राझील, भारत आणि मेक्सिकोमध्ये मक्याचा वापर वाढेल. मगील हंगामाच्या तुलनेत मक्याचा वापर ०.६ टक्क्याने वाढेल. मात्र काही देशांची आयात कमी होण्याचा अंदाज असून जागतिक पातळीवरील मक्याचा व्यापार २ टक्क्यांनी कमी होईल. यूएसडीच्या अंदाजानुसार यंदा चीन आणि जपानची मका आयात कमी होईल तर टर्की आणि इंडोनेशिया जास्त आयात करू शकतात.

मर्यादित साठा

महत्त्वाच्या मका निर्यातदार देशांमध्ये मक्याचा साठा कमी आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे लक्ष नव्या उत्पादनाकडे आहे. बाजारातील विक्रीमुळेही दरात चढ-उतार दिसत आहेत. अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या व्यापार युद्धामुळे बाजारातील अनिश्‍चितता वाढली आहे. चीनने अमेरिकेतून मका खरेदी वाढवण्याचा निर्णय घेतला तर मात्र मक्याचे दर वाढतील. थोडक्यात, मागणी- पुरवठ्याचे गणित पाहता पुढील काही काळ मक्याचे दर दबावातच राहू शकतात; मात्र निर्यातदार देशांतील कमी साठा आणि उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाल्यास बाजाराला आधार मिळू शकतो, असेही बीएमआयने आपल्या अहवालात म्हटले आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

१. २०२५-२६ मध्ये मका उत्पादन किती अपेक्षित आहे?
अंदाजानुसार १३०० कोटी टन, जो विक्रमी उत्पादन असेल.

२. मका दरात घट का येते?
वाढलेले उत्पादन आणि फ्युचर्स विक्रीमुळे दरावर दबाव आहे.

३. मक्याचा व्यापार कमी का होईल?
काही देशांनी आयात कमी करण्याचा अंदाज आहे, त्यामुळे व्यापारात २% घट अपेक्षित.

४. मक्याचे दर वाढू शकतात का?
होय, जर साठा कमी राहिला आणि चीनने आयात वाढवली तर दरात सुधारणा होऊ शकते.

५. भारत मका उत्पादनात कुठे आहे?
भारत मका उत्पादनवाढीचा महत्त्वाचा देश असून यंदा उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Beekeeping Business: मधुमक्षिका पालन; कमी खर्चात जास्त नफा देणारा शेतीपूरक व्यवसाय!

Farmer Protest: पातुर्डा येथे राज्यव्यापी हक्क परिषदेत शेतकरी नेते कडाडले

Agrowon Diwali Article: सुखी माणसाचा सदरा गवसतो तेव्हा...

Sugarcane Worker Issue: ऊस तोडणी कामगारांना फरक न दिल्यास संप

Development Project: मावळ तालुका कृषी विकासाचा आदर्श बनेल : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

SCROLL FOR NEXT