Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Agriculture Scam: ‘कृषी’तील गैरव्यवहारांचे सविस्तर अहवाल द्या

Agriculture Department: कृषी विभागातील गैरव्यवहारांचा बोभाटा झाल्यानंतर राज्याच्या कृषी मंत्रालयाने कृषी आयुक्तालयाकडून अहवाल मागविला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Team Agrowon

Pune News: कृषी विभागातील गैरव्यवहारांचा बोभाटा झाल्यानंतर राज्याच्या कृषी मंत्रालयाने कृषी आयुक्तालयाकडून अहवाल मागविला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गुणनियंत्रण व दक्षता पथकातील वादग्रस्त कामकाज, कृषी अधिकाऱ्यांकडून निविष्ठा उद्योगात केलेल्या कथित गुंतवणुकीची झालेली चर्चा तसेच काही अधिकाऱ्यांनी बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आलेल्या तक्रारी या सर्वच मुद्द्यांवर कृषी मंत्रालयाने आयुक्तालयाकडे सविस्तर अहवाल मागविला आहे.

आयुक्तालयातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, ऐन खरिपात आम्हाला नियोजन सोडून गैरव्यवहारांच्या चौकशा करण्याची कामे दिली आहेत. तरीदेखील नियमित कामे सांभाळून गैरव्यवहारांच्या काही मुद्द्यांची चौकशी पूर्ण केली असून त्याचे अहवाल मंत्रालयाकडे पाठविले आहेत. अद्याप काही मुद्द्यांची चौकशी सुरू आहे.

दांगट समितीची कार्यपद्धत जाहीर नाही

दरम्यान, कृषी विभागातील गैरव्यवहाराचा शोध घेण्यासाठी राज्य शासनाने नियुक्त केलेल्या डॉ. उमाकांत दांगट समितीची पुढील दिशा स्पष्ट करण्यात आलेली नाही. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, समितीचे कार्यालय कुठे असेल, समितीचा अधिकृतपणे मनुष्यबळ किंवा समन्वयक अधिकारी कोण असेल, समिती राज्यभरातून तक्रारी गोळा करणार का, करणार असल्यास तक्रारी कुठे पाठवायच्या, या समितीसमोर आलेल्या तक्रारींची चौकशी नेमकी कशी केली जाणार, आलेली तक्रार खरी की खोटी हे कोण व कसे ठरविणार, अशा अनेक प्रश्‍नांमुळे समितीचे कामकाज वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.

सौम्य शिक्षा देण्याचे प्रकार संशयास्पद

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की गैरव्यवहाराच्या चौकश्यांचा केवळ फार्स केला जात असून ठोस कारवाई होण्याची शक्यता दिसत नाही. मुळात, चौकशीत दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांना मंत्रालयातूनच पाठीशी घातले जात आहे. दक्षता पथकाचे तत्कालीन अधीक्षक गोविंद मोरे व सध्याचे उपसंचालक किरण जाधव दोघेही दोषी आढळले. परंतु मोरे यांच्यावर कोणतीही कारवाई न करता केवळ बदली केली गेली.

जाधव यांची कारकीर्द वादग्रस्त असताना त्यांनाही केवळ बदलीवर अलगद बाजूला करण्याची शिफारस केली गेली आहे. अधिकाऱ्यांना केवळ चौकशीच्या जाळ्यात ओढून त्यांना संशयास्पदपणे सौम्य शिक्षा देण्याचे लागोपाठ प्रकार चालू आहेत. प्रमोद लहाळे, शंकर तोटावार, रमेश भताने यांच्या तक्रार प्रकरणांमध्ये संशयास्पदरीत्या कारवाई टाळण्याचा प्रकार झाल्याचे दिसून आले आहे,’’ असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farmers Support: कांद्याच्या भावात घसरण, उपाययोजनांसाठी सरकारकडून समिती गठित

Crop Damage Nashik: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ७३ कोटींच्या निधीचा प्रस्ताव

Fertilizer Overprising: सोलापूर जिल्ह्यातील १९ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित

Assembly Elections 2026: पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात विक्रमी ९१.४६ टक्के, तामिळनाडूत ८४.४१ टक्के मतदान

Crop Insurance Hingoli: हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनचा ९८ कोटी ७० लाख रुपये पिकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT