Ginger Agrowon
ॲग्रो विशेष

Ginger Rate : साताऱ्यात आले दरात सुधारणा

उत्पादकांना दिलासा; प्रति गाडीस कमाल २० ते २२ हजार रुपये दर

Team Agrowon

Satara News : आले पिकाच्या दरात (Ginger Rate) सुधारणा होऊ लागली असून, प्रति गाडीस (५०० किलो) कमाल २० ते २२ हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहेत. बियाणे काढणीस सुरुवात झाल्यावर दरात सुधारणा होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मागील पाच वर्षांपासून दरवाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या आले उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळत आहे.

मागील चार वर्षांत आले पिकाच्या (Ginger Crop) दराने नीचांकी पातळी गाठली होती. यामुळे आले उत्पादक अडचणीत आले होते. याचा परिणाम आले पिकांच्या क्षेत्रावर झाला आहे. एकूण लागवडीच्या तुलनेत २५ टक्के क्षेत्र कमी झाले आहे.

मागील सहा महिन्यांपासून आले पिकाच्या दरात संथगतीने का होईना सुधारणा सुरू झाली आहे. सध्या प्रतिगाडी मागे चार ते पाच हजार रुपयांनी सुधारणा झाली आहे.

सध्या आले पिकास प्रति गाडी कमाल २० ते २२ हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. या हंगामात अति पावसामुळे आले पिकावर मूळकुजाचा प्रार्दुभाव वाढल्याने आले पीक काढून टाकावे लागले आहे. एकूण क्षेत्राच्या २० टक्के अधिक क्षेत्रावरील आले पीक काढले गेले आहे.

दरातील घसरणीमुळे क्षेत्रातही मोठी घट झाल्याने एकूणच आले पिकाचे क्षेत्र कमी शिल्लक आहे. यामुळे पुढील काळात दरात आणखी सुधारणा होण्याचे अंदाज व्यक्त केले जात आहेत.

यामुळे शेतकऱ्यांनी आले काढणीची घाई करू नये असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे. मागील पाच वर्षांपासून दरवाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या आले उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळत आहे.

बियाण्याला मिळणार चढे दर

जिल्ह्यात मे महिन्यापासून आले लागवड सुरू होते. या काळात सुरू असलेल्या दरात चार ते पाच हजार रुपये चढ्या दराने बियाणे मिळणार आहे. मागील वर्षी आठ ते १२ हजार रुपये दराने बियाणे विक्री झाली होती.

या वर्षी बियाण्याचे दर प्रति गाडी २० ते २५ हजार रुपयांदरम्यान जाण्याची शक्यता आहे. खते, कीटकनाशके तसेच मशागतीचे वाढलेले दर व बियाण्याचे दर यामुळे भांडवली खर्चात मोठी वाढ होणार आहे. याचा परिणाम क्षेत्रावर होणार असल्याने आले पिकांचे क्षेत्र कमी होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

Government Assistance: शेतकरी आत्महत्येची आठ प्रकरणे मदतीसाठी पात्र

Marathwada Rain Deficit: मराठवाड्यात पावसाच्या तुटीमुळे पेरणी क्षेत्रात ७ टक्क्यांची घट

Buldhana DCC Bank: बुलडाणा जिल्हा बँकेवर सहकार पॅनेलचे वर्चस्व

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT