Ginger farmers of Sangli agrowon
ॲग्रो विशेष

Ginger farmers of Sangli : सांगलीचे आले उत्पादक शेतकरी कंदकुजमुळे अडचणीत

Ginger Farmers : नवीन आले पिकास २० रुपये किलो, तर जुन्या आल्यास ५० रुपये किलो असा दर असल्यामुळे उत्पादनापेक्षा खर्च अधिक होत असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.

sandeep Shirguppe

Ginger Farmers : सांगली जिल्ह्यात झालेल्या मागच्या ४ दिवसात दमदार पाऊस झाला. यामुळे शेतात पाणी राहिल्याने आले पिकाला मोठा फटका बसला आहे. आले पिकाला जास्त पाणी लागल्याने कंदकुज झाल्यामुळे क्षेत्र मोठ्या प्रमाणात बाधित झाले आहे. पीक टिकविण्यासाठी शेतकऱ्यांकडून प्रयत्न केले जात असल्याने खर्चही वाढला आहे. नवीन आले पिकास २० रुपये प्रति किलो, तर जुन्या आल्यास ५० रुपये प्रति किलो असा दर मिळत आहे. परंतु उत्पादनापेक्षा खर्च अधिक होत वाढल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

मागील वर्षी आले पिकाला पुरेसा पाऊस असल्याने १० हजार एकर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी लागवड केली होती. यातून बऱ्याचे शेतकऱ्यांना फायदा झाला होता. परंतु यंदा जादा पावसामुळे ३५ टक्के क्षेत्र कंदकुजमुळे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लागवडीच्या ३० ते ३५ टक्के क्षेत्रावर पिकांवरील कंदकुज झाली आहे.

सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडी तालुक्यात खोडवा आले काढणी अंतिम टप्प्यात आहे. गणपती उत्सवात चांगला दर मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु यावेळी शेतकऱ्यांची निराशा झाली. खोडवा आले काढणीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे, तो दसऱ्यांपर्यंत संपवावा लागतो. अन्यथा जुने आले खरेदी व्यापाऱ्यांकडून टाळली जाते. त्यामुळे शेतकरी कोंडीत सापडले आहेत.

कमी दर असतानाही आले काढण्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्यामुळे आर्थिक नुकसान होणार आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर बाजारात फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT