8th Pay Commission agrowon
ॲग्रो विशेष

8th Pay Commission : केंद्रीय मंत्रीमंडळाचा मोठा निर्णय! आठव्या वेतन आयोगाला मंजूरी

Central Government : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ होणार आहे. मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत गुरूवारी (ता.१६) पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

sandeep Shirguppe

Central Government Cabinet Meeting : केंद्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोग देण्यास सहमती दर्शवली आहे. अनेक महिन्यांपासून सरकारी कर्मचाऱ्यांकडून आठवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी लावून धरली होती. याला मंजुरी मिळाल्याने केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ होणार आहे. मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत गुरूवारी (ता.१६) पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार पगार मिळत होता. २०१४ मध्ये सातव्या वेतन आयोगाची घोषणा झाली होती. २०१६ मध्ये हा वेतन आयोग लागू करण्यात आला होता. दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू केला जातो. दरम्यान, आता आठवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे.

अर्थसंकल्पापूर्वी मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी बातमी दिली आहे. आठव्या वेतन आयोगाला मंजुरी देऊन सर्व कर्मचाऱ्यांना खूश केले आला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५३ टक्क्यांवर गेला आहे. त्यावेळी मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक अनेक महिन्यांपासून आठव्या वेतन आयोगाच्या प्रतिक्षेत होते. आता सरकारने त्यांची प्रतिक्षा संपवली आहे.

असे वाढू शकते वेतन

आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होण्याची शक्यता आहे. अहवालानुसार अंतर्गत फिटमेंट फॅक्टर किमान २.८६ निश्चित केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतनात समान वाढ होऊ शकेल. ती वाढ ५१ हजार ४८० रुपये होऊ शकते.

सध्या किमान मूळ वेतन १८ हजार रुपये आहे. यासोबतच निवृत्तीवेतनधारकांनाही हाच लाभ मिळणार आहे. त्यांचे किमान पेन्शन सध्याच्या ९ हजार रुपयांवरून २५ हजार ७४० रुपयांपर्यंत वाढणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Online Money Games Bill : केंद्र सरकारकडून ऑनलाईन मनी गेमिंगवर बंदी घालणारे विधेयक लोकसभेत मंजूर

Animal Care : अतिवृष्टी, पूरपरिस्थितीत पशुधनाची काळजी

Bail Pola Festival : जपा बैलांचे आरोग्य...

Soybean Crop Protection: जोरदार पावसानंतर सोयाबीन पिकावरील कीड-रोग व्यवस्थापन

Pomegranate Farming : डाळिंब शेतीत राज्यासाठी आदर्श ठरले पन्हाळे बंधू

SCROLL FOR NEXT