Hapus Mango  Agrowon
ॲग्रो विशेष

Hapus QR Code : ‘जीआय’ नोंदणीकृत हापूसला ‘क्यूआर कोड’

QR code available for Mango : कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेने जीआय नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ‘क्यू आर’ कोड उपलब्ध करून दिले आहेत.

Team Agrowon

Ratnagiri News : ग्राहकांना अस्सल हापूस आंबा मिळावा आणि शेतकऱ्याला चांगला दर मिळावा यासाठी कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेने जीआय नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ‘क्यू आर’ कोड उपलब्ध करून दिले आहेत. हापूस आंबा फळावर लावण्यासाठी सुमारे आठ लाख आणि पेटी किंवा बॉक्सवर लावण्यासाठी सुमारे एक लाख ‘क्यू आर’ कोडचे लक्ष्य ठेवले आहे. ‘क्यू आर’ कोडसाठी मीरो लॅब कंपनीशी करार करण्यात आल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले.

कोकणातील पाच जिल्ह्यांसाठी हापूस या नावाने जीआय (भौगोलिक निर्देशांक) मिळाले आहे. त्यासाठी मानांकन देण्यासाठी निवडलेल्या संस्थांमध्ये कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेचा समावेश आहे. जीआय नोंदणीसाठी संस्थेकडून प्रयत्न सुरू आहेत. ग्राहकाला दर्जेदार हापूस मिळावा यासाठी सुमारे दोन वर्षांपूर्वी उत्पादक संस्थेचे अध्यक्ष डॉ. विवेक भिडे यांच्या संकल्पनेतून क्यू आर कोड प्रक्रिया राबविण्यात आली.

त्यात काही त्रुटी जाणवल्या होत्या. त्यामध्ये क्यू आर कोडला एक्सपायरी डेट नसल्यामुळे तो पुन्हा वापरला जाण्याची शक्यता होती. त्याचा पूनर्वापर करून गैरफायदा घेतला जाऊ शकत होता. त्रुटी दूर करून यंदा क्यू आर कोड नव्याने निर्माण केले आहेत. त्यामध्ये मुदतबाह्य (एक्सपायरी) तारीख, आंबा पॅकिंगची तारीख, आंबा परिपक्व होण्याची तारीख, हापूस आंबा बागायतदाराची सविस्तर माहिती म्हणजे बागेचे फोटो, गुगल लोकेशन, शेतकऱ्याची माहिती त्यांचे मोबाइल नंबर, ई-मेल वगैरे अनेक आवश्यक गोष्टी कोडमार्फत मिळू शकतात. चांगल्या आंब्यामुळे शेतकऱ्याला सतत ग्राहक मिळत राहावा यादृष्टीने कोडमध्ये सुधारणा केल्या गेल्या.

आंब्यावरील क्यू आर कोड ६५ पैसे प्रति आंबा या दराने दिला जात असून बॉक्सवरील कोड तीन रुपये दराने दिला जाणार आहे. बागायतदारांना कोड अ‍ॅक्टिव्ह कसा करावा यासंबंधी प्रशिक्षणही दिले जात आहे.

१७७३ जणांकडे ‘जीआय’

कोकणातील बागायतदारांनी हापूस आंब्याची विक्री करताना ‘जीआय’ घेणे आवश्यक आहे. आतापर्यंत कोकणातील १७७२ जणांनी ‘जीआय’ घेतले आहे. त्यातील १0५७ जणांनी कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते संस्थेकडे ‘जीआय’साठी नोंदणी केलेली आहे, असे अध्यक्ष डॉ. विवेक भिडे यांनी सांगितले.

शासनस्तरावर वेगवेगळ्या खात्यांच्या माध्यमातून हापूस आंब्याच्या विक्रीवेळी होणारी भेसळ रोखली गेली तर हापूस आंब्याला आणि बागायतदारांना सुखद दिवस येतील. त्यासाठी सर्वच खात्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. पणन महामंडळाकडून चांगला पाठपुरावा केला जात आहे.
मुकुंदराव जोशी, सचिव, कोकण हापूस आंबा उत्पादक संस्था

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT