KVK Agrowon
ॲग्रो विशेष

Ghatkhed KVK : घातखेड ‘केव्हीके’चे तंत्रज्ञान विस्तारात मोठे योगदान

Technology Development : कृषी विभागाच्या खांद्याला खांदा लावत संशोधन संस्थांद्वारे विकसित तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात घातखेड कृषी विज्ञान केंद्र मोलाची भूमिका बजावत आहे.

Team Agrowon

Nagpur News : कृषी विभागाच्या खांद्याला खांदा लावत संशोधन संस्थांद्वारे विकसित तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात घातखेड कृषी विज्ञान केंद्र मोलाची भूमिका बजावत आहे. त्याच्याच परिणामी जिल्ह्यात व्यावसायिक पिकांखालील क्षेत्र विस्तारत वेळ आणि श्रमात बचतीसाठी विविध संयंत्राचा वापरही वाढला आहे, असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले.

घातखेड केव्हीकेच्या वतीने आयोजित सुवर्ण जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रमसाफल्य फाऊंडेशनचे विश्‍वस्त प्रल्हाद ठाकरे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, आत्मा प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने, वरिष्ठ शास्त्रज्ञ तसेच केव्हीके प्रमुख डॉ. अतुल कळसकर, अंकुर सिड्स कंपनीचे महाव्यवस्थापक अमोल शिरसाट, डॉ. वडाळकर यांची या वेळी उपस्थिती होती.

अर्चना निस्ताने यांनी देखील या वेळी विचार व्यक्‍त केले. केव्हीके, कृषी विभाग तसेच आत्मा या तीनही यंत्रणाचा अंतिम उद्देश कृषी विद्यापीठासोबतच इतर संशोधन संस्थांनी विकसित केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हा आहे.

घातखेड केव्हीकेच्या वतीने दुर्गम मेळघाटातील आदिवासींपर्यंत पीक प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून तंत्रज्ञान विस्तारासाठी पुढाकार घेण्यात आला आहे, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे, असे त्या म्हणाल्या.

केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या सघन कापूस लागवड प्रकल्पाची अंमलबजावणी केव्हीकेच्या माध्यमातून होत आहे. त्यासोबत यांत्रिकीकरणालाही प्रोत्साहन दिले जात असल्याची बाब दिलासादायक असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. अतुल कळसकर यांनी प्रास्ताविकातून केव्हीकेच्या आजवरच्या वाटलाची माहिती दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indigenous Cow Conservation: स्वावलंबी शेतीसाठी देशी गाईंचे संवर्धन व्हावे

Rabi Fodder Cultivation: अहिल्यानगर जिल्‍ह्यात रब्बी चारा लागवड ९६ हजार हेक्टरवर

Banana Crop Insurance: केळी उत्पादकांना हेक्टरी ७४ हजारांचा पीकविमा मंजूर

Asha Bhosle Passes Away: ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन, वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Kharif Season Training: तात्त्विक माहिती न देता प्रत्यक्ष कृतीवर भर देणार: आसलकर

SCROLL FOR NEXT